आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्माच्या आधारावर रोजगार प्राप्त करणारे पाहिल्यास हिंदू-ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर तर मुस्लिम सर्वात पिछाडीवर आणि शीख दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सांख्यिकी मंत्रालयाच्या कालबद्ध मनुष्यबळ पाहणीत(पीएलएफएस) ही माहिती समोर आली. जुलै २०२० ते जून २०२१ मध्ये ४.१ लाख लोकांवर केलेल्या पाहणीनुसार, ४१-४१% हिंदू व ख्रिश्चन, ३७% शीख आणि ३४% मुस्लिमांना रोजगार मिळाला.
स्थलांतर; कोरोनात शहरांतून गावी परतले ५२%, शहरांत गेले ५४%
हे कारण...गावात कामाचा मोबदला ताशी ~58 व शहरांत ~85 मिळताे ग्रामीण भागात रोजगार करणारे लोक आठवड्याला ४५ तास आणि शहरांत ५० तास काम करतात. गावात मासिक सरासरी कमाई १०.५ हजार रुपये आणि शहरांत १७ हजार रुपये. या हिशेबाने गावात कामाचे ताशी प्रत्येकी उत्पन्न सरासरी ५८ रु. व शहरांत ८५ रुपये आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमाई जवळपास दुप्पट कमी आहे. गावांत कामावर जाणारी महिला मासिक सरासरी ४.६ हजार रुपये आणि शहरांत ७.२ हजार रुपये कमावते. कामाचे तास मात्र पुरुषांच्या बरोबरीने असतात.
कमाई; हिंदू-ख्रिश्चन समान, मुस्लिम पिछाडीवर, शीख समाज दुसऱ्या स्थानी
महिला पुढे; ५ वर्षांत हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यात महिलांची आघाडी
पीएलएफएसनुसार 2017-18 मध्ये 35.5% हिंदू, 35.8% ख्रिश्चन, 28.9% मुस्लिम नोकरीत. 2020-21 मध्ये हिंदू व ख्रिश्चन 40.7%-40.7%, मुस्लिम 33.9% पर्यंत पोहोचले. म्हणजे ५ वर्षांत 5-5% वाढ.
यात शीख थोडे पिछाडीवर. 2017-18 मध्ये 33.7% शीख लोक रोजगारात. 2020-21 मध्ये 37% झाले. 3.3% वाढ.
महिलांच्या रोजगाराचा विचार करता गेल्या ५ वर्षांत हिंदू 7.8%, मुस्लिम 5.8%, ख्रिश्चन 8.7% आणि शीख महिलांची संख्या 7.2% वाढली. पुरुषांहून अधिक.
पालन; बिहार, झारखंड, राजस्थानात कमावणाऱ्यांपेक्षा पोटे अधिक
देशात अवलंबित्व सरासरी(१५-६४ वर्षाप्रति १०० लोकांवर ०-१४ वर्षे व ६५ वर्षांवरील ४४ लोक आहेत.) ४४.३ आहेत. राज्यांच्या हिशेबाने राजस्थानसह ५ राज्यांत ही ५०% पेक्षा जास्त म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. कमाई करणाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशात सर्वाधिक मेघालयात ६५.९, बिहारमध्ये ५८.३, झारखंडमध्ये ५३.१, यूपीत ५१.३, राजस्थानात ५०.४ आहे.
रोजगारात हे अव्वल; हिमाचल प्रदेश पहिल्या, मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी
पीएलएफएसनुसार, हिमाचल प्रदेशात लोकसंख्येच्या तुलनेत 49.4% लोक रोजगारात. देशात सर्वाधिक प्रमाण. लडाखमध्ये सर्वात कमी 14.3% जणांनाच रोजगार.
5 राज्यांत लोकसंख्येच्या तुलनेत 45% हून अधिक लोक रोजगारात. यात हिमाचल (49.4%), मप्र (47%), झारखंड (46%), सिक्कीम (46%) आणि छत्तीसगड (45.3%).
रोजगार असलेल्या पुरुषांत सर्वाधिक 64.5% मध्य प्रदेशात. 62% गुजरात आणि 60.3% प. बंगालमध्ये. महिलांत िहमाचल (43%) अव्वल.
कोरोनाचा सर्वात मोठा टप्पा जुलै २०२० ते जून २०२१ दरम्यान होता. तेव्हा सुमारे ५२% लोक शहरांतून गावांत परतले. याच अवधीत ५४% लोक गावांतून शहरातही आले. पीएलएफएसने १.११ लाख स्थलांतरितांवर केलेल्या पाहणीत हे आकडे समोर आले. त्यानुसार, ४४% लोकांनाही एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागले. ४४.६% लोक रोजगाराच्या शोधात एका गावातून दुसऱ्या गावी गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.