आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Central Govt । Buster । Center Will Provide Rs 95,082 Crore To The States In A Week Infrastructure Development.

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा:केंद्राकडून राज्यांना बुस्टर डोस, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठवड्याभरात राज्यांना मिळणार 95 हजार 82 कोटी रुपयांचा निधी

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोचा धोका कमी झाल्यानंतर तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. हळूहळू सर्वच उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही रुळावर येताना दिसत आहे. कोरोनानंतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे अधिक निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

येत्या आठवड्याभरात सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून 95 हजार 82 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा रुळावर येताना दिसत असलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सामायिक कृती योजना तयार करण्यात आली.

उत्तर प्रदेशसह 15 राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते, तर 11 राज्यांचे अर्थमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर निर्मला सीतारामन यांनी राज्यांना एकाच वेळी दोन हप्ते देण्याचा निर्णय घेतला आहे.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी तसेच राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राला मिळणाऱ्या एकूण महसूलापैकी 41 टक्के वाटा हा राज्यांना दिला जातो. त्यामुळे सुमारे 74 हजार 541 कोटींचा हप्ता राज्यांना दिला जाणार आहे. त्याशिवाय तितक्याच रकमेचा आणखी एक हप्ता राज्यांना दिला जाणार आहे. केंद्राकडून राज्यांना एकत्रितपणे दोन हप्ते मिळणार आहे.

राज्यांच्या तिजोरीत भर पडावी यासाठी केंद्राने एकाच वेळी दोन हप्ते जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पैसा मिळणार आहे. केंद्र सरकार केंद्रीय कराच्या माध्यमातून राज्यांना वर्षभरात 14 हप्त्यांच्या स्वरूपात निधी देते.

साधारणपणे एप्रिल ते फेब्रुवारी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला प्राप्त होतात, तर 3 हप्ते शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये दिले जातात. मार्चमध्ये द्यायच्या तीन हप्त्यांपैकी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत एक हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...