आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने आधारच्या नियमात बदल करून आदेश जारी केले आहेत. केंद्राने जारी केलेल्या आदेशानुसार, आधार क्रमांक मिळाल्यापासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा ते अपडेट करणे आवश्यक असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, आधार अपडेट केल्याने सेंट्रल आयडेंटिफिकेशन डेटा रिपॉझिटरीमध्ये (CIDR) संबंधित माहितीची निरंतरतेच्या आधारावर अचूकता सुनिश्चित होईल.
10 वर्षे पूर्ण झाल्यावर करावे लागेल अपडेट
मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आधारधारक आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी किमान एकदा ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्र असलेली कागदपत्रे अपडेट करू शकतात. हे निरंतरतेच्या आधारावर CIDR मधील आधार लिंक्ड माहितीची अचूकता सुनिश्चित करेल. आधार अपडेटबाबत आधारच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
तुम्ही ऑनलाइनदेखील करू शकता अपडेट
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांना आवाहन केले होते की, जर त्यांना आधार क्रमांक मिळाल्याच्या तारखेपासून 10 वर्षांहून अधिकचा काळ झाला असेल आणि त्यांनी संबंधित माहिती पुन्हा अपडेट केली नसेल, तर ते माहिती अपडेट शकतात आणि आधारमधील रहिवासी पुरावा कागदपत्रे यासह अपडेट करावे. UIDAI ने आधार अपडेट करणे सोपे करण्यासाठी एक नवीन सुविधा विकसित केली आहे. माय आधार पोर्टल आणि त्यांच्या अॅपद्वारे ही सुविधा ऑनलाइन मिळवता येते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्याही आधार नोंदणी केंद्रालाही भेट देऊ शकते.
गतवर्षी 16 कोटी आधार झाले अपडेट
UIDAI ने आतापर्यंत 134 कोटी आधार क्रमांक जारी केले आहेत. UIDAIच्या या निर्णयामुळे किती आधारधारकांना त्यांची माहिती अपडेट करावी लागेल, हे सध्यातरी माहिती नाही. मात्र, गेल्या वर्षी आधारमध्ये विविध प्रकारचे सुमारे 16 कोटी अपडेट झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.