आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरवर सरकारचा मोठा निर्णय:कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरला पाठवलेल्या निमलष्करी दलाच्या 10 हजार सैनिकांना तात्काळ परत येण्याचे आदेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 सीएपीएफ कंपन्यांना तात्काळ आपल्या बेस लोकेशनवर जाण्याचे आदेश

केंद्र सरकारने बुधवारी केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधून तात्काळ 10 हजार निमलष्करी दलाच्या जवानांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स (सीएपीएफ)च्या जम्मू-काश्मीरमधील तैनातीवर आढावा घेतला आणि हा निर्णय घेण्यात आला.

एका जेष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितल्यानुसार, 100 सीएपीएफ कंपन्यांना तात्काळ आपल्या बेस लोकेशनवर परत जाण्याचा आदेश केंद्राकडून देण्यात आला आहे. या कंपन्यांना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर तैनात करण्यात आले होते.

याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमधून परत जातील जवान

केंद्राच्या निर्देशानुसार, सीआरपीएफच्या 40 कंपन्या, सीआयएसएफच्या 20 कंपन्या, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स आणि सशस्त्र सीमा दलाला याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमधून परत बोलवले जाईल. सीआयएएफच्या एका कंपनीमध्ये 100 जवान असतात. यापूर्वी गृह मंत्रालयाने मे 2020 मध्ये सीएपीएफच्या 10 कंपन्या जम्मू-काश्मीरमधून परत बोलवल्या होत्या. केंद्राच्या आदेशानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या 60 बटालियन राहतील. एक बटालियनमध्ये एक हजार जवान असतात.

बातम्या आणखी आहेत...