आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Central University Will Take Online Admission Test For The First Time This Year; Paper By Open Book, Guidelines Next Week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:केंद्रीय विद्यापीठ या वर्षी प्रथमच घेणार अाॅनलाइन प्रवेश परीक्षा; ओपन बुकद्वारे पेपर, मार्गदर्शक तत्त्वे पुढील आठवड्यात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे काही शाळांना जूनपासून अभ्यासक्रम सुरु करावा असे सुचविण्यात आले आहे

अमितकुमार निरंजन

शालेय तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर लाॅकडाऊनचा विपरीत परिणाम हाेत अाहे. हे लक्षात घेऊन यूजीसी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. यासाठी कुलगुरूंकडून मते मागवण्यात आली अाहेत. 

काही विषयांच्या प्रवेश परीक्षा अाेपन बुक व अाेपन इंटरनेटच्या माध्यमातून घेता येऊ शकतील, असा प्रस्ताव एअायईसीटीईने महाविद्यालयांना दिला अाहे. तर शालेय शिक्षणाच्या बाबतीत राज्यांना अापल्या स्तरावर ठाेस निर्णय घ्यावा लागेल, असे मत सीबीएसईने व्यक्त केले अाहे.

उच्च शिक्षण : सामूहिक प्रवेश परीक्षा

शैक्षणिक सत्र लवकर सुरू हाेणार की उशिरा याबाबत अद्याप निर्णय हाेऊ शकलेला नाही. केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सामूहिक निर्णय घेतला जाऊ शकताे. गरज पडल्यास सामूहिक प्रवेश परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना अाॅनलाइन कंटेंट देण्याचीही तयारी अाहे.

एआयसीटीई  : ओपन बुक परीक्षा 

काही विषयांसाठी पुस्तके, मुक्त इंटरनेट, मुक्त चर्चा करता येऊ शकेल. यासाठी २४ तास अगोदर सांगावे लागेल.  हे सूत्र सर्व विषयांसाठी लागू होणार नाही. अंतिम निर्णय विद्यापीठे घेतील.

शालेय शिक्षण : जूनपासून अभ्यास 

शाळा शैक्षणिक वर्ष तयार करतात. तथापि, काही शाळांनी कोरोनामुळे एप्रिल, मेमध्ये सुट‌्या द्याव्यात व जूनपासून अभ्यास सुरू करावा, असे सुचवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...