आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Centre Asks States To Register FIRs । Involved In Assault On Doctors । Health Professionals

केंद्राच्या राज्यांना सूचना:आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसेप्रकरणी गुन्हे दाखल करा, सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्टवर नजर ठेवा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोषी आढळल्यास 5-7 वर्षे शिक्षा आणि 2-5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो

केंद्र सरकारने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसेला गांभीर्याने घेतले आहे. शनिवारी केंद्राने राज्य सरकारला याबाबत पत्र लिहीले आहे. त्यात डॉक्टरसह इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. केंद्राने आरोग्य कर्मचाऱ्यांना नुकसान पोहचवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे.

हे पत्र केंद्रीय गृह सचिव अजय भल्लांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे. गृह सचिवांनी पत्रात लिहीले की, हिंसेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होऊ शकते. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवा. त्यांच्यावर हिंसा करणाऱ्यांवर कड करावाई करा. अशा प्रकरणांची सुनावणीदेखील लवकरात लवकर केली जावी.

दोषींना जामीन मिळत नाही

महामारी कायद्यांतर्गत एखादा व्यक्ती डॉक्टरवर झालेल्या हिंसेत दोषी आढळल्यास, त्याला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिवाय, दोन लाखांचा दंडही लागू शकतो. गुन्हा गंभीर असल्यावर शिक्षा सात वर्षांपर्यंत आणि दंडांची रक्कम पाच लाख रुपये होऊ शकते. अशा प्रकरणात दोषींना जामीनही मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...