आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Centre Refuses Report । Claims India Covid Deaths 7 Times More । Coronavirus Outbreak India Cases; News And Live Updates

कोरोना मृत्यूंबाबत पुन्हा वाद:भारतात 7 पटीने मृत्यूचा दावा करणार्‍या परदेशी माध्यमांचा अहवाल केंद्राने नाकारला; म्हणाले - ही आकडेवारी विश्वासार्ह नाही

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ICMR आणि WHO च्या मार्गदर्शक सुचनांचे सरकारकडून पालन

केंद्र सरकारने मोठ‌्या प्रमाणावर मृत्यूचा दावा करणार्‍या परदेशी माध्यमांचा अहवाल नाकारला आहे. काही दिवसांपूर्वी परदेशी माध्यमांनी भारतात 5 ते 7 पटीने मृत्यू होत असल्याचा दावा केला होता. तसेच सरकारी आकडे आणि वास्तविक आकड‌्यांत मोठी तफावत असल्याचे म्हटले होते. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देताना हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्या अहवालाचे नाव न घेता निषेध केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने 'द इकॉनॉमिस्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाला काल्पनिक आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले की, या अहवालात ज्या आकड्यांचा उल्लेख केला, त्याला कोणत्याच प्रकारचा आधार नाही. त्यासोबतच कोणत्याही देशात डेटाचा याप्रकारे अभ्यास केला जात नसल्याचे मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

केंद्र सरकारचे 4 पॉइंट्समध्ये स्पष्टीकरण
1. संशोधन कोणत्या पद्धतीने केल्या गेले हे अहवालात नमूद नाही. कारण अशा प्रकारच्या इंटरनेट संशोधनासाठी रिसर्च गेट आणि पबमेडची मदत घेतली जाते.
2. या अहवालात तेलंगणाच्या विमा दाव्यांचा आधार घेण्यात आला. त्यामुळे हे स्पष्ट होते की, या अहवालाला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
3. या अहवालामध्ये निवडणुकांच्या निकालांवर सर्वेक्षण करणाऱ्या सी-व्होटर आणि प्रश्नम सारख्या एजन्सींचा डेटा वापरला गेला. परंतु, या एजन्सींना सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संशोधनाचा कोणताही अनुभव नाही. कधीकधी त्यांचे दावे निकालांपेक्षा भिन्न असतात.
4. स्थानिक सरकारी डेटा, काही कंपन्यांच्या नोंदी आणि मेलेल्या लोकांच्या नोंदींवरून हा अहवाल तयार केला गेला असल्याचे नमूद केले आहे. परंतु, ते विश्वासार्ह मानले जाऊ शकत नाही.

ICMR आणि WHO च्या मार्गदर्शक सुचनांचे सरकारकडून पालन
देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत पारदर्शकता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूत गोंधळ होऊ नये यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मे 2020 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केले जात आहे. त्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या आयसीडी -10 कोडचे मृत्यूचे अचूक नोंदी ठेवण्यासाठी पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आकडेवारींचा केंद्र सरकारकडून अभ्यास
केंद्र सरकारने यापूर्वीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अचूक डेटा जाहीर करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारची टीमही यावर काम करत आहेत. राज्यांमधून येणार्‍या आकडेवारीचा दररोज जिल्हानिहाय अभ्यास केला जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. ज्या राज्यांमधून मृतांची संख्या सातत्याने कमी येत आहे, त्यांना जिल्हानिहाय याची पुन्हा तपासणी करण्यास आदेश देण्यात आले आहे.

मासिकाने 19 आठवड्यांच्या डेटाला बनविला आधार
ब्रिटनची मॅगझिन 'द इकॉनॉमिस्ट'ने काही दिवसांपूर्वी भारत देशात सरकारी आकड्यांपेक्षा 5 ते 7 पटीने मृत्यू होत असल्याचा दावा केला होता. शनिवारी यासंबंधित एक लेख यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यामध्ये व्हर्जिनियामधील कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर लेफलरच्या संशोधनाला आधार बनवले होते.

अहवालात दावा करण्यात आला होता की, भारत देशात 2021 च्या 19 आठवड्यांमध्ये कोरोनामुळे प्रति 1 लाख लोकांमध्ये 131 ते 181 लोक मरण पावले. हा अहवाल 6 राज्यांमधील संशोधनाच्या आधारे तयार करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर याची संपूर्ण भारत देशात अंमलबजावणी केली गेली असती तर 2021 मध्ये 19 आठवड्यांत 17 लाख ते 24 लाख लोक मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.