आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीत केंद्राला प्रतिमेची चिंता:डॅमेज कंट्रोलसाठी केंद्र सरकार, भाजपने सुरू केली सकारात्मकता मोहिम; RSS ही देत आहे साथ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नड्डा यांनी आपल्या पत्रातही काँग्रेसवर निशाणा साधला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पद्धतींविषयी टीकेचा सामना करत असलेले केंद्र सरकार आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतले आहे. यासाठी आता त्रिस्तरीय व्यूहरचनेवर काम सुरू झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनियंत्रित होत असलेल्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी भाजप, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघा (RSS) ने पॉझिटिव्हिटी मोहिम हाती घेतली आहे.

केंद्र आणि भाजपच्या या पॉझिटिव्हिटी मोहिमेत केंद्रातील काही अधिकारी आणि संयुक्त सचिव सुद्धा सहभागी होत आहेत. त्यांच्यासाठी गेल्या आठवड्यात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संकटात होत असलेल्या टीकेदरम्यान सरकारची सकारात्मक कामे जनतेपर्यंत चांगल्या पध्दतीने पोहोचवणे आणि सरकारची सकारात्मक बाजू समोर आणणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'च्या ट्विटर हँडलवरही पॉझिटिव्हिटीसंदर्भात संदेशचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री सोशल मीडियावर ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांशी संबंधित आणि इतर तत्सम कामांशी संबंधित कथा आणि लेखही भरपूर शेअर करत आहेत.

दुसरीकडे सरकारच्या निषेधाला पक्षपातळीवरही प्रतिसाद दिला जात आहे. याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे - भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणे. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया यांनी सरकारचा निषेध केला होता. त्याला उत्तर म्हणून नड्डा यांनी मंगळवारी 4 पानाचे पत्र पाठवून साथरोगातील सरकारच्या कामांचा पाढा वाचला.

नड्डा यांनी आपल्या पत्रातही काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, 'आजच्या परिस्थितीत कॉंग्रेसच्या कृतीमुळे मला आश्चर्य वाटले नाही, मी दु: खी आहे. एकीकडे त्यांच्या पक्षाचे काही सदस्य लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून नकारात्मकतेच्या प्रसारामुळे हे कौतुकास्पद काम डागाळले जात आहे. देश साथीच्या आजाराशी लढत आहे आणि कॉंग्रेस भ्रमाचा प्रसार करत आहे.

RSS घेत आहेत धर्मगुरूंचे व्याख्यान
सरकार आणि पक्षाबरोबरच RSS देखील सकारात्मकतेच्या मोहिमेमध्ये गुंतले आहे. संघाने 11 मे पासून एक ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याला पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड नाव देण्यात आले आहे. यात टॉप मोटिवेटर्स, धर्म गुरू आणि प्रमुख उद्योगपतींचे व्याख्यान आयोजित केले जात आहेत. हे कार्यक्रम 15 मेपर्यंत चालेल. याच साखळीमध्ये RSS प्रमुख मोहन भागवतही देशासाठी संबोधन करत आहेत.

प्रशांत किशोर म्हणाले - पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली असत्य पसरवण्याचा प्रयत्न
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की देशातील दु: खाचे वातावरण आणि सर्वत्र होणार्‍या दुर्घटना यांच्यात पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली असत्य आणि प्रचार करण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. हे घृणास्पद आहे.

बातम्या आणखी आहेत...