आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा राज्य सरकारे आपापल्या पातळीवर निर्णय घेऊन सुरू करू शकतील. याबाबत केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून या पार्श्वभूमीवर आता मुलांना शाळेत जाणे सक्तीचे असेल किंवा ते ऑनलाइन वर्ग करू शकतात. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारवर सोपवण्यात आला असला तरी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास प्रत्येक वेळी मास्क घालावा लागेल. केंद्राकडून जारी दिशानिर्देशांत नमूद करण्यात आले आहे की, राज्य स्थानिक स्थितीच्या आधारावर शाळा उघडण्याचा निर्णय घेऊ शकतात. मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांशी बोलून होईल. मुले शाळेत येऊ इच्छित नसतील तर त्यांच्या हजेरीत सूट दिली जाईल.
केंद्र सरकारनुसार, शाळेत पुरेशी जागा असेल तर मुलांना खेळ, गीत-संगीतासह अन्य अॅक्टिव्हिटीत सूट असेल. मात्र, शाळेत पुरेशी जागा असेल तरच सवलत मिळेल. शाळेचा अवधी कमी केला जाऊ शकतो. वसतिगृहेही उघडली जाऊ शकतात. बस आणि कॅब सतत निर्जंतुकीकरण करावे लागेल. सध्या ११ राज्यांत शाळा सुरू आहेत. १६ राज्यांत शाळा अंशत: आणि ९ राज्यांत पूर्ण बंद आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.