आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Centre's Instructions To Social Media Companies; Twitter Claims To Have Blocked 50 Tweets; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अफवा पसरवणारा मजकूर हटवा:केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश; 50 ट्वीट्स प्रतिबंधित केल्याचा ट्विटरने केला दावा

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडिया कंपन्यांतर्फे ल्युमॅन डेटाबेस या स्वतंत्र शोध संस्थेला माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे

कोरोना महामारीबाबत अफवा पसरवणारा किंवा चुकीची माहिती देणारा मजकूर हटवा, असे निर्देश केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहेत. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी हे निर्देश जारी केले. मंत्रालयाने विविध सोशल मीडिया कंपन्यांना १०० पेक्षा जास्त ‘बनावट पोस्ट्स’ची माहिती दिली आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की, या पोस्ट्समध्ये कोरोनाच्या नावावर देण्यात आलेली माहिती असंबद्ध, जुनी आणि संदर्भहीन आहे. त्यात वापरलेली छायाचित्रे, ग्राफिक्स हेही असंबद्ध आहेत.

एवढेच नव्हे तर विविध समुदायांत वैमनस्य निर्माण करणारी सामग्रीही त्यात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘संपूर्ण देश कोरोनाच्या स्थितीशी धैर्याने मुकाबला करत असतानाच काही लोक फक्त अफवा पसरवत आहेत. सोशल मीडियाचा दुरुपयोग करून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. असा मजकूर त्वरित हटवण्यात यावा.’ काही लोक त्याचा दुरुपयोग करीत असल्याने ही कारवाई गरजेची आहे असे मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ५० ट्वीट्स प्रतिबंधित केल्याचे ट्विटरने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. या ट््वीट्सबाबत केंद्रीय मंत्रालयाने आक्षेप घेतला होता.

कोणत्या प्रकारची सामग्री?
सोशल मीडिया कंपन्यांतर्फे ल्युमॅन डेटाबेस या स्वतंत्र शोध संस्थेला माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या पद्धतींवर सर्वच पोस्ट्समध्ये टीका करण्यात आली आहे. काही पोस्ट्समध्ये छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओही टाकण्यात आले आहेत. त्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले होते. अशा प्रकारच्या पोस्ट्स एक चित्रपट निर्माता, एक खासदार, एक आमदार आणि एका पत्रकारानेही फाॅरवर्ड केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...