आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Centre's Mission Covid Security; Vaccine To Reach Every Man, Rs 3,000 Crore Sanctioned

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:केंद्राचे मिशन कोविड सुरक्षा; प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल लस, 3 हजार कोटी रुपये मंजूर

पवनकुमार | नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निधीत मंत्रालय-संस्थेचा किती वाटा हे अनिश्चित

कोरोना विषाणूपासून बचावासाठी लस बनवण्यापासून प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यापर्यंतच काम आता मिशन मोडमध्ये होईल. केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय मिशन बनवून ‘मिशन कोविड सुरक्षा’ असे नाव दिले आहे. त्यासाठी तीन हजार कोटींचे बजेटही मंजूर केले आहे.

या कामास १२ ते १८ महिन्यांचा अवधी लागेल, असे केंद्राचे आकलन आहे. विदेशात कुठे लस विकसित झाली तर तिथपर्यंत पोहोच कायम राहावी हेही या मिशनमध्ये सुनिश्चित केले जाईल. लस तयार करण्याचे काम करत असलेल्या कंपन्यांचे संशोधन, त्यांना कच्चा माल उपलब्ध करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे यासाठी केंद्र सहकार्य करेल. लस विकसित करण्याचे इतर खर्च आणि भविष्यात त्याच्या वितरणावरील खर्च याच निधीतून होईल. सध्या देशात ३० पेक्षा जास्त कंपन्या कोरोना विषाणू बनवत आहेत. तीन कंपन्या लसीच्या मानवावर वैद्यकीय चाचण्या घेत आहेत. सहा कंपन्या पूर्ववैद्यकीय चाचणी स्तरावर आहेत. आरोग्य मंत्रालय, केंद्रीय औषधी आणि प्रमाणन नियंत्रण व लसीसाठी कच्चा माल पुरवठादार कंपन्या या प्रक्रियेत स्टेक होल्डर्स आहेत.

निधीत मंत्रालय-संस्थेचा किती वाटा हे अनिश्चित

मिशन कोविड सुरक्षेसाठी निधीवर केंद्राने सैद्धांतिक सहमती तर दिली आहे, पण त्याचा किती वाटा कोणत्या मंत्रालयाला, संस्थेला किंवा विभागाला द्यायचा आहे हे निश्चित नाही. अधिकाऱ्यांनुसार, जसजसे मिशन पुढे जाईल, निधीची गरज भासेल, त्यानुसार निधी दिला जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser