आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Centre's Periodic Labor Survey \ Unemployment: 37% Of People Had To Stay At Home For 1 Year, 13% For 3 Years

नोकरीसाठी लाखो लोकांची भटकंती:कोरोनाकाळात देशामध्ये 37% लोकांना 1 वर्ष, 13% ना 3 वर्षे घरी बसावे लागले

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात लाखो लोकांना नोकरी गमवावी लागली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने पीरिऑडिक लेबर फोर्स (पीएलएफएस) सर्व्हेनुसार, ३७% लोकांना सहा महिने ते एक वर्षापर्यंत घरी बसावे लागले. ४.१ लाख लोकांच्या जुलै २०२० ते जून २०२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात हे आकडे समोर आले आहेत.

बाजी : नोकरदार एसटी पुरुषांत ३%, महिलांत १३% वाढ
२०१७-१८ मध्ये नोकरदार एसटी पुरुष ५३.४% होते, ते २०२०-२१ मध्ये ५६.५% तच पोहोचू शकले, पण महिलांचे प्रमाण २५.९% वरून वाढून ३९.१%.

२०१७-१८ पासून २०२०-२१ च्या दरम्यान नोकरदार एससी ३५.२% वरून वाढून ४०.२%, ओबीसी ३४% वरून ३९.२% आणि इतर ३३.५% वरून ३७.६% पर्यंत पोहोचले. ४ वर्षांत एकूण आकडा ३४.७% च्या तुलनेत ३९.८%.

असा बदलला ट्रेंड : १५ वर्षांवरील महिलांत ११%, पुुरुषांत २% वाढ
२०१७ ते २०२१ दरम्यान १५ ते २९ वयोगटात महिला कर्मचाऱ्यांत ५%, तर पुरुषांत ४% पर्यंतच वाढ. पण १५ व त्यावरील वयोगटात महिला ११.४% वाढल्या, पुरुषांत २% च वाढ झाली.

२०१७-१८ दरम्यान गावांत ३५% व शहरांत ३३.९% कामगार होते. २०२०-२१ मध्ये गावांत ४१%, शहरांत ३६%.

कठीण काळ : २४% लोकांची नोकरीसाठी १-२ वर्षे भटकंती
जुलै २० ते जून २१ दरम्यान १५% लोकांना ६ महिन्यांपेक्षा कमी, ३७% ना ६ महिने ते १ वर्ष, २३.९% ना १-२ वर्षे, ११% ना २-३ वर्षे व १३% ना ३ वर्षांवर बेरोजगार राहावे लागले.

३ वर्षांपेक्षा जास्त बेरोजगार महिलांची सरासरी १६.५% व पुरुषांची १२%. ६ महिने ते १ वर्ष बेरोजगार पुरुष जास्त.

नोकरी : ५ वर्षांत नोकरदार पुरुषांत ३% व महिलांत ७% पेक्षा जास्त वाढ
नोकरी मिळवण्याच्या प्रकरणात पुरुषांच्या तुलनेत महिलांनी वेगाने पावले उचलली. गेल्या चार वर्षांच्या पीएलएफएसच्या तुलनेत नोकरदार पुरुषांची सरासरी फक्त ३% आणि महिलांची ७% पेक्षा जास्त वाढली. २०१७-१८ मध्ये १६.५% महिला व ५२% पुरुष नोकरीत होते. २०२०-२१ मध्ये महिला २४% व पुरुषांत ५४.९% पर्यंत वाढ झाली.

प्रगती : नोकऱ्यांत आदिवासी सर्वात आघाडीवर, इतरांपेक्षा वेग दुप्पट
जातीच्या आधारावर नोकऱ्या पाहिल्यास धक्कादायक चित्र दिसते. सर्वात पिछाडीवर असल्याचे मानले जाणाऱ्या आदिवासी (एसटी) वर्गातील लोक नोकऱ्या मिळवण्यात सर्वात पुढे राहिले. २०१७-१८ दरम्यान वर्कफोर्समध्ये लोकसंख्येच्या हिशेबाने त्यांचा वाटा ४०% होता, तो २०२०-२१ मध्ये ४७.९% झाला म्हणजे त्यात ८% वाढ झाली. एससी-ओबीसींत ५-५% च वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...