आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर शेतकऱ्यांचे 25 दिवस:शेतकऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण, टोलवसुली बंद; कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीहून आलेल्या शिष्टमंडळाशी अण्णा हजारे यांनी चर्चा केली. - Divya Marathi
दिल्लीहून आलेल्या शिष्टमंडळाशी अण्णा हजारे यांनी चर्चा केली.
  • पंतप्रधान माेदींच्या ‘मन की बात’वेळी थाळीनाद करणार; शेतकऱ्यांचा इशारा

केंद्राने रविवारी शेतकरी संघटनांना चर्चेचे निमंत्रण दिले. शेतकऱ्यांना बैठकीची तारीख कळवण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन २५ व्या दिवशीही सुरूच होते. रविवारी सायंकाळपर्यंत सरकार व आंदोलकांची रणनीती स्पष्ट झाली. आंदोलनाची पुढील दहा दिवसांची रूपरेषा जाहीर करण्यात आली. शेतकरी नेत्यांनी सांगितले की, तिन्ही कृषी कायद्यांविरोधात सर्व ठिकाणी सोमवारी शेतकरी साखळी उपोषणास सुरुवात करतील. विरोध दर्शवत २३ डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जाईल. हरियाणात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान तीन दिवस टोलवसुली होणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी थाळीनाद करणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर सोमवारी किंवा मंगळवारी शेतकरी नेत्यांना भेटतील. त्याआधी अखिल भारतीय किसान सभेने दावा केला की, आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत श्री गुरू तेगबहादूरजी यांचा शहीद दिवस पाळण्यात आला.

आंदोलनात सहभागी होण्याचे अण्णांना साकडे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, या मागणीसाठी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मुलांनी रविवारी राळेगणसिद्धीत येत थाळीनाद आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनास जागा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करू, हे आपले शेवटचे आंदोलन असेल, असे हजारे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचे समाधान झाले.

आरोप : केंद्रीय मंत्री म्हणाले- शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय जास्त वाटते
केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकारणाने प्रेरित म्हटले. रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्र्यांनी दावा केला की, मागील सहा महिन्यांत झालेल्या बदलांमुळे शेतकरी खूप खुश आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वाटते की त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. हे आंदोलन राजकीय जास्त वाटत आहे.

आंदोलकांचा इशारा : यूपीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की, राज्याच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर-ट्रॉल्या जप्त केल्या जात आहेत. हे न थांबल्यास महामार्गाची दुसरी लेनही बंद करू, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

आंदाेलनात ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा
शेतकऱ्यांचे उत्तर : शेतकरी संघटनांनी सांगितले की, आंदोलनाचे राजकीय पक्षाशी घेणे-देणे नाही. पीएम मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना लिहिलेल्या पत्रात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने म्हटले आहे की, आंदोलन पक्षांनी प्रायोजित केल्याचा सरकारचा गैरसमज झाला आहे.

आंदोलन एका राज्याचे नव्हे, देशभरातून पाठिंबा
सरकार मुद्दाम उशीर करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मंजितसिंह राय यांनी सांगितले की, सरकारसोबत अनेक टप्प्यात चर्चा होऊनही त्यांची भूमिका बदललेली नाही. या प्रकरणात ते मुद्दाम उशीर करत आहेत. कडक थंडीसोबतच वयस्करांच्या अडचणीतही वाढ होत आहे. ते म्हणाले की, हे एका राज्याचे आंदोलन नाही. त्याला देशभरातून पाठिंबा मिळतोय. दरम्यान, कायद्याची प्रादेशिक भाषांमध्ये केंद्राकडून माहिती देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...