आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Challenge Of Death In The Path Of Agitation: 4 More Farmers Killed On Singhu And Tikri Border; One Was Only 18 Years Old

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 54 मृत्यू:सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर आणखी 4 शेतकऱ्यांचा मृत्यू; एकाचे वय फक्त 18 होते

सोनीपत/बहादुरगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या बठिंडाच्या 18 वर्षीय जश्नप्रीत सिंगचा शनिवारी मृत्यू झाला. - Divya Marathi
टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या बठिंडाच्या 18 वर्षीय जश्नप्रीत सिंगचा शनिवारी मृत्यू झाला.
  • कुणाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये तर कुणाचा टेंटमध्ये मृत्यू

नवीन कृषी कायद्याविरोधात मागील 39 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जणांनी आत्महत्या केली, तर काहींचा आजारपण, थंडी आणि हार्ट अटॅकने मृत्यू झाला. सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर रविवारी आणखी 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यातील दोन हरियाणा आणि दोन पंजाबचे रहिवासी होते. हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

कुणाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये तर कुणाचा टेंटमध्ये मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बहादुरगडच्या जवळ असलेल्या टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या बठिंडाच्या 18 वर्षीय जश्नप्रीत सिंगची शनिवारी अचानक तब्येत खराब झाली. यानंतर त्याला आधी सिविल आणि नंतर पीजीआय हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. परंतू, तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हरियाणातील जगबीर(वय 66) यांचा मृतदेह ट्रॉलीत आढळला
हरियाणातील जगबीर(वय 66) यांचा मृतदेह ट्रॉलीत आढळला

. तेदेखील टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी होते. याशिवाय, सिंघू बॉर्डरवर सोनीपतचे बलवीर सिंग आणि पंजाबच्या लिदवांचे रहिवासी निर्भय सिंग यांचा शनिवारी टेंटमध्ये झोपेतच मृत्यू झाला.

39 दिवसात 54 मृत्यूनंतर उठली भरपाईची मागणी

26 नोव्हेंबरपासून दिल्ली बॉर्डरवर हजारो-लाखोंच्या संख्येत शेतकरी आंदोलन करत आहेत. यादरम्यान, 54 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर त्यांचे कुटुंबिय आणि शेतकरी संघटनांनी नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला नोकरीची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...