आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena Supreme Courte Today Hearing | Chance Of Hearing In Supreme Court Today, Demand For Immediate Hearing From Shinde Group

महाराष्ट्रातील सत्‍तासंघर्ष:आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता, शिंदे गटाकडून तत्काळ सुनावणीची मागणी

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील राजकीय संकटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील बंडखोर गट शिंदेसेनेकडून दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सुनावणी करू शकते. मुख्यमंत्री शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांच्या तत्काळ सुनावणी अर्जावर सरन्यायाधीश लळीत आणि न्या. रवींद्र भट्ट यांच्या पीठाने सांगितले की, बुधवारी प्रकरणाची सुनावणी होऊ शकते. कौल म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पाहता त्यावर त्वरित उपाय आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय खंडपीठ खटल्याची सुनावणी करेल.

दरम्यान,राज्यातील सत्तासंघर्षात निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे केली. निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...