आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन चाकाच्या ऑटोचा स्पीड आणि बुलेटची स्पीड यात भरपूर फरक आहे, असे म्हणत भाजपचे नवनिर्वाचित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. बावनकुळे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्री अमित शाह, भाजपचे पक्षअध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.
भाजप आणि शिवसेना युतीमध्ये महाराष्ट्रच्या निवडणुका लढणार आहोत. जेवढे यश स्थानिक स्वाराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळाले नाही. त्यापेक्षा मोठे यश यावेळेस मिळेल, असा दावा बावनकुळे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने अडीचवर्ष खूप भोगले आहे. आता महाराष्ट्र बदला घेण्याच्या परिस्थितीमध्ये असून नक्कीच जनता मतदानातून बदला घेईल. सत्तेत आल्यापासून ज्यापद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. ते पाहता पुढच्या अडिच वर्षात मागच्या अडीच वर्षांचा बॅकलॉक दूर करु. एवढे चांगले काम महाराष्ट्रात होणार असून पुढच्या निवडणुकीत मविआच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
आज विधिमंडळाबाहेर झालेल्या राड्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मविआचे नेते बावचाळलेल्या परिस्थितीमध्ये काहीही वक्तव्य करत आहेत. विशेष करुन अमोल मिटकरी हे महाराष्ट्रात वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करत आहेत. अमोल मिटकरी यांनी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.