आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकासाचा मुद्दा असेल तर गुजरात मॉडेल चांगले किंवा यूपी किंवा केरळ मॉडेल, अशी चर्चा सुरू होते. मात्र, सरकारी प्रयत्न आणि संसाधनांपासून दूर असलेल्या बिहारच्या सिवान जिल्ह्यात विकासाचे ‘परिवर्तन मॉडेल’ चर्चेत आहे. हे मॉडेल कोणत्याही सरकारला विचार करण्यास भाग पाडू शकते. जिल्ह्याच्या जिरादेई तालुक्यातील २१ गावांचा ‘परिवर्तन’ नावाच्या एका संस्थेने कायापालट केला आहे.
संस्थेने या ठिकाणी थेट ६००० लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देत त्यांचे आयुष्य सुखकर केले आहे. एक-दोन क्षेत्रातच नाही तर इथे प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन झाले आहे. संस्थेने ३००० पेक्षा जास्त लोकांना हातमागाच्या कामाचे प्रशिक्षण दिले आहे. यात बहुतांश महिला आहेत. या गावांमध्येच शेतीवर संशोधन सुरू करत ११३५ आधुनिक शेतकरी घडवले आहेत. खेळांमध्ये रस असणाऱ्या ५०० पेक्षा जास्त मुलांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत वेगवेगळ्या खेळांमध्ये २५ मुले राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. मुलांच्या शिक्षणावर इथे वेगळे काम होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व याच गावांमध्ये आणि येथील परंपरा लक्षात घेऊन केले जात आहे. जिरादेई हे गाव देशाचे पहिले राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद यांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र, आता यामध्ये परिवर्तन नावही जोडले गेले आहे. या परिवर्तनाचे सूत्रधार तक्षशिला शिक्षण संस्था चालवणारे संजीव सिंह आणि त्यांची मुलगी सेतिका सिंह आहेत. संजीव यांनी २०११ मध्ये परिवर्तनाची सुरुवात केली. वडिलांपासून प्रेरित होत सेतिकाने यालाच आपले करिअर बनवले आहे. आधी युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी अँड डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर तीदेखील वडिलांसोबत परिवर्तनमध्ये काम करायला लागली. संजीव आणि सेतिका यांनी कामाची सुरुवात आपले वडिलोपार्जित गाव नरेंद्रपूर येथून केली आणि याच्या ५ किमीच्या परिघात येणाऱ्या २१ गावांपर्यंत परिवर्तनचा विस्तार केला. तक्षशिला शिक्षण संस्थेच्या देशात ४ मोठ्या शाळा आहेत.
असे झाले परिवर्तन
शिक्षण, उपजीविका आणि खेळांसह परिवर्तनने गावांमधील कलावंतांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. परिवर्तनने गावांमध्येच संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान शिकवले. हवामान विभागाचे यंत्रही येथे लावण्यात आले. परिवर्तनने आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने नरेंद्रपूरमध्ये स्टेडियम बनवले व तिथे तरुणांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आज इथे ५०० पेक्षा जास्त तरुणांना राज्यस्तरीय प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळते. परिवर्तनने गावातील तरुणांना नरेंद्रपूरच्या सेंटरमध्ये बोलावून हातमागाचे प्रशिक्षण देणे सुरू केले. २१ गावांमध्ये तयार हेणाऱ्या चादरी आणि साड्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांमध्ये नाव कमावत आहेत.
सेतिका सिंह
संजीव सिंह
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.