आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा भाजपवर निशाणा:मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान बदला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भाजप मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. आज भाजपच्या बैठकीत हा निर्णय झाला असुन भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. विजय रुपाणी यांच्यासह भाजपने मागच्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत, त्यामुळे एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे काँग्रेसने भाजप विरोधात जोरदार निशाना साधला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

भाजप सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवले. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला. तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...