आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता सेनादलात सहभागी हाेण्यास इच्छुक उमेदवारांना आधी ऑनलाइन कॉमन एंट्रन्स एक्झाम (सीईई) द्यावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवारच फिजिकल फिटनेस आणि मेडिकल टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतील.
याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या मध्यात याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी होईल. पहिली ऑनलाइन सीईई एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० परीक्षा केंद्रांवर होईल. सूत्रांच्या मते या प्रक्रियेच्या मदतीने देशभरात व्यापक पोहोच होईल आणि भरतीदरम्यान होणारी गर्दीही कमी होईल. भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाइन सीईई होणार आहे. त्यानंतर भरतीदरम्यान सीईईत यशस्वी उमेदवारांचे फिटनेस आणि शेवटी मेडिकल तपासणी होईल. यापूर्वी उमेदवारांना शारीरिक चाचणीतून जावे लागत होते. यानंतर मेडिकल आणि शेवटचा टप्पा सीईईचा होता. आता ऑनलाइन सीईई पहिलाच टप्पा असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.