आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Changes In CoWIN Portal, OTP To Be Shared At The Time Of Vaccination, Option To Choose Between Vaccines

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कोविन पोर्टलमध्ये नवीन बदल, आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • लसीकरणादरम्यान मोबाईलवर आलेला OTP सांगावा लागेल

भारतात 18+ वयोगटातील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. काही दिवसांपासून कोविन पोर्टल योग्यरित्या चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारीनंतर आता यात बदल करण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन ज्यांनी लसीकरणासाठी वेळ घेतला होता, पण काही कारणास्तव त्यांना लस घ्यायला जाता आले नाही. अशांना लस घेल्याचे मेसेज येऊ लागले. या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पोर्टलमध्ये बदल केले.

काय आहेत नवीन बदल ?

या नवीन बदलानुसार, व्हक्सीन रजिस्ट्रेशननंतर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, तर तुमच्या मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल. या OTP ला लसीकरण केंद्रावर दाखवावा लागेल. या ओटीपीद्वारे तुम्ही अपाइंटमेंट घेतल्याचे सिद्ध होईल. यामुळे व्हॅक्सीनेशच्या डेटामध्येही काही गडबड होणार नाही.

का केला बदल ?
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यात सांगण्यात येत होते की, ज्यांनी अपॉइंटमेंट बुक केली, पण लस घेतली नाही. अशा लोकांना लस घेतल्याचे मेसेज येऊ लागले आणि त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील जारी होऊ लागले. या तक्रारीनंतर मंत्रालयाने या पोर्टलमध्ये बदल केले. यानुसार, आता ओटीपीद्वारे लस घेतल्याची पुष्टी होईल.

पोर्टलवर अजून काही बदल झाले ?

हो, पोर्टलवर अजून बदल झाले आहेत. OTP शिवाय कोविन पोर्टलच्या डॅशबोर्डमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव टाकल्यानंतर 6 नवे ऑप्शन ओपन होतील. या पर्यायांमधून वयोगट (18+ किंवा 45+), व्हॅक्सीनचा प्रकार (कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), फ्री किंवा पेड व्हॅक्सीन निवडू शकता. या बदलानंतर आता तुम्हाला कोणती व्हॅक्सीन घेतली, याची माहितीदेखील मिळेल.

बदलानंतर कशी झाली रजिस्ट्रेशन प्रोसेस ?

 • सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरुन http://cowin.gov.in एंटर करुन कोविन पोर्टलवर जा.
 • तुमच्या स्क्रीनच्या उजब्या बाजुला Register / Sign In Yourself वर क्लिक करा.
 • तुमचा मोबाइल नंबर एंटर करुन Get OTP पर क्लिक करा.
 • मोबाइलमध्ये आलेलाल OTP एंटर करुन वेरिफाय करा.
 • यानंतर व्हॅक्सीनसाठी रजिस्टर करुन तुमचा फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख टाका.
 • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घ्या.
बातम्या आणखी आहेत...