आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:चॅनल्सनी अर्धसत्य दाखवू नये, मानहानीकारक कंटेंट नको, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्णव गोस्वामी, रिपब्लिक टीव्हीवर सुनावणी होणार

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी खासगी टीव्ही चॅनल्ससाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. तीत म्हटले आहे की, केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अधिनियम, १९९५ नुसार कोणत्याही कार्यक्रमात अर्धसत्य आणि कोणाचीही मानहानी करणाऱ्या सामग्रीचे प्रसारण केले जाऊ नये. टीव्हीच्या कार्यक्रमांत अश्लील, मानहानीकारक, खोटी किंवा अर्धसत्य असलेली किंवा एखादी व्यक्ती, समूह, समाजातील एखादा वर्ग, जनता किंवा देशाच्या नैतिक जीवनावर टीका करणारी, लांछन लावणारी किंवा अपमानित करणारी सामग्रीही नसावी.

अलीकडेच न्यूज चॅनलमध्ये तबलिगी जमात आणि सुशांत केससह काही प्रकरणांच्या रिपोर्टिंगबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ही प्रकरणे न्यायालयांतही गेली आहेत.

अर्णव गोस्वामी, रिपब्लिक टीव्हीवर सुनावणी होणार
गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाबाबतची माहिती किंवा बातम्या प्रसारित करण्यावर पत्रकार अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक चॅनलला बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली हायकोर्ट २७ नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser