आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Char Dham Yatra 2021 Update; Coronavirus News | Char Dham Yatra Suspended By Tirath Singh Rawat Uttarakhand Government; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार धाम यात्रेवर कोरोनाचे सावट:उत्तराखंड सरकारने पुढच्या महिन्यात सुरु होणारी चार धाम यात्रा केली रद्द; केवळ पुजारी अनुष्ठानांचे पालन करतील

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केदारनाथ, बद्रीनाथ हे अनुक्रमे 17 व 18 मे रोजी भाविकांसाठी खुले होणार होते तर गंगोत्री आणि यमुनोत्री 14 मे पासून उघडणार होते

देशात कोरोनाच्या महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने पुढील महिन्यापासून सुरु होणारी चार धाम यात्रा रद्द केली आहे. दरम्यान, मंदिरात फक्त पुजार्‍यांनाच विधी करण्यासाठी प्रवेश राहणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिली. देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

चार धाम यात्रेमध्ये समाविष्ट असलेले केदारनाथ, बद्रीनाथ हे अनुक्रमे 17 व 18 मे रोजी भाविकांसाठी खुले होणार होते तर गंगोत्री आणि यमुनोत्री 14 मे पासून उघडणार होते. दरम्यान, गेल्या वर्षी यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे यावेळी काटेकोरपणे कोरोना प्रोटोकॉल ठेवून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते.

उत्तराखंडचे पर्यटन महाव्यवस्थापक जितेंद्र कुमार यांच्या मते, 2019 मध्ये गढवाल विकास मंडळ निगमला धार्मिक प्रवाशांच्या बुकींगपासून 10 कोटींपेक्षा जास्‍त उत्पन्न मिळाले होते. परंतु, गेल्या वर्षी 2020 मध्ये हे उत्पन्न शुन्यांवर आले होते. या राज्यात दरवर्षी 4 कोटी पर्यटक येत असून यामध्ये 60 लाख लोक धार्मिक यात्रेकरु असतात.

बातम्या आणखी आहेत...