आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Char Dham Yatra । Start Today। First AArti । Organize By Prime Minister Modi

चारधाम यात्रा 2021:अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज उघडणार यमुनोत्री धामचे कपाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील पहिली पुजा

देहरादून2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या गंगोत्री, तर 17 ला उघडणार केदारनाथ धामचे कपाट

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज यमुनोत्री धामचे कपाट उघडतील. यादरम्यान पहिली पुजा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. यासाठी चारधान देवस्थानम बोर्डाने 1101 रुपये मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उप जिल्हाधिकारी चतर सिंह चौहान यांना दिले.

देवस्थानम बोर्डाचे मीडिया प्रमुख डॉ. हरीश गौडने सांगितले की, चारधाम यात्रा स्थगित करण्यात आलीये, यामुळे फक्त मंदिराचे कपाट खुले राहतील. मंदिराशी संबंधित काही मोजक्या लोकांनाच आत जाण्याची परवानगी असेल.

आज आई यमुनेची उत्सव पालखी यमुनोत्रीकडे रवाना होईल. यापूर्वी पालखीला शीतकालीन प्रवास स्थान खरसाली (खुशीमठ) मध्ये सजवण्यात आले. येथे यमुना आरती आणि यमुना स्तुतीनंतर डोली तीर्थ पुरोहित शनी महाराजाच्या मंदिरात आणण्यात आली. येथून पालखीला आई यमुनेचे बंधु शनी महाराजांच्या नेतृत्वात यमुनोत्री धामकडे रवाना केले.

उद्या गंगोत्री, तर 17 ला उघडणार केदारनाथ धामचे कपाट
15 मे गंगोत्री धाम आणि 17 मे रोजी सकाळी 7 वाजता बाबा केदारनाथ धामचे कपाट उघडतील. यानंतर 18 मे रोजी सायंकाळी श्री बद्रीनाथ धामचे कपाट उघडतील. शुक्रवारी बाबाची पंचमुखी पालखी श्री ओंकारेश्वर मंदिर उखीमठकडून केदारनाथ धामकडे रवाना झाली. पालखी शनिवारी केदारनाथला पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...