आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Charanpaduka, Idol Found While Excavating The Foundation Of Shriram Janmabhoomi Temple

अयोध्या:श्रीराम जन्मभूमी मंदिराचा पाया खोदताना सापडल्या चरणपादुका, मूर्ती

अयोध्या6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन सीता मातेची रसोई मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.

जन्मभूमी परिसराचे समतलीकरण सुरू आहे. त्यात अनेक स्तंभ, शिवलिंग इत्यादी प्राचीन अवशेष आधीच सापडले. त्यांना ट्रस्टने सुरक्षित ठेवले आहे.

राममंदिर क्षेत्रात ४० फूट खोल खोदकाम करण्यात आले. उत्तर-पूर्व दिशेतील मानस भवनाच्या परिसरात समतल करण्याचे काम सुरू आहे. ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले, समतलीकरणादरम्यान काही मंदिरे व इमारतींना पाडण्यात आले होते. सापडलेल्या गोष्टी याच मंदिरांतील अवशेष असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...