आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेदारनाथ आणि बद्रिनाथ धाममध्ये दानासाठी क्यूआर कोड लावण्यात आल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात केस नोंदवण्यात आली आहे. हे क्यूआर कोड मंदिर समितीने लावले नव्हते असे स्पष्टीकरण बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिले आहे. थोड्याच वेळात हे क्यूआर कोडचे बोर्ड हटवण्यात आले.
मंदिराचे कपाट उघडताच ठकांनी हे क्यूआर कोड लावले होते. काही भाविकांनी या क्यूआर कोडवरून पेमेंटही केले. भाविकांनी क्यूआर कोडवरून दान करू नये असे आवाहन आम्ही केल्याचे अजेंद्र अजय यांनी सांगितले.
या प्रकरणी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर चौकशीची मागणी केली होती. नंतर रविवारी केदारनाथ पोलिस चौकी आणि बद्रिनाथ ठाण्यात याची तक्रार करण्यात आली.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की मंदिर समितीच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात केस नोंदवण्यात आली आहे.
25 एप्रिलला उघडले केदरनाथ मंदिराचे कपाट
उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे कपाट 25 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता उघडले होते. मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्यांनी मंदिराचे कपाट उघडले. मंदिर 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराचे कपाट उघडण्यापूर्वी 72 तास तिथे हिमवृष्टी झाली होती. खराब हवामानामुळे मंदिरात जाणाऱ्या हजारो तीर्थयात्रींना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते. बद्रिनाथ मंदिराचे कपाट 27 एप्रिलला उघडले होते.
ही बातमीही वाचा...
चारधाम यात्रा:केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, मंदिर 20 क्विंटल फुलांनी सजले, खराब हवामानानंतरही दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे मंगळवारी सकाळी 6.20 वाजता उघडले. मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी मंदिराचे दरवाजे उघडले. मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.