आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chardham Yatra Begins; Pilgrimage Hotels Filled Up A Week Ago, Gangotri Yamunotri Dham

श्रद्धा अनलॉक:चारधाम यात्रा सुरू; तीर्थक्षेत्रांची हॉटेल्स आठवडाभरापूर्वीच भरली, गंगोत्री-यमुनोत्री धाम 2 वर्षांनंतर खुले

डेहराडून18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय्य तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कपाटे भाविकांसाठी खुली झाली. केदारनाथ ६ मे आणि बद्रीनाथ ८ मे रोजी खुले होईल. या मंदिरांची कपाटे उघडण्याच्या आठवडाभर आधीच येथे भाविकांची गर्दी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेथील सर्व हॉटेल्स व धर्मशाळा आरक्षित झाल्या आहेत. सुमारे ५ हजार प्रवासी आधीच पोहोचले. मंगळवारी बाबा केदारनाथची पंचमुखी मूर्ती उखीमठहून केदारनाथला रवाना झाली. डोली यात्रा ५ मे रोजी केदारनाथला पोहोचेल. ६ मेपासून भाविकांना तेथे दर्शन घेता येईल.

१. दुपदरी रस्ता, बायपासमुळे दिलासा
पूर्वी ऋषिकेशहून गंगोत्रीला पोहोचण्यास पूर्ण दिवस लागत होता. उदा. एखादे वाहन ऋषिकेशहून सकाळी ६ वाजता निघाले,तर ते रात्री ९ वाजता गंगोत्रीला पोहोचत असे. अरुंद रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली तर विलंब जास्त होई. बाेगदा, दुपदरी रस्ता, बायपासमुळे आता प्रवासी ऋषिकेशहून ९ तासांत गंगोत्रीला जातात. नव्या बांधकामांमुळे प्रवास सुकर झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्याही वाढली आहे.

२. निसर्गसाैंदर्य पाहण्याची संधी
रात्रीपर्यंत मुक्कामी पोहोचणे हे आधी ध्येय असे आता मात्र मार्गातील निसर्गसाैंदर्य पाहण्यासाठी भाविकांना भरपूर वेळ मिळतो. उदा. ऋषिकेशहून चंबाला पोहोचताच तिहरी तलाव दिसतो. त्याच्या काठाने बांधलेल्या मार्गावरून ५० किमी प्रवास होतो. चंबा येथून हिमालय दिसतो. प्रवाशांना ऑटाेग्राफी, सेल्फी घेण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. त्यामुळे ते तलावाच्या काठावर तर कधी धबधब्यावर थांबलेले दिसतात.

३. आदिगुरु शंकराचार्यांची समाधी
केदारनाथ धाममध्ये आदिगुरू शंकराचार्यांची समाधी उभारण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर म्हणाले की, स्थापनेच्या वेळी पर्यटनाचा हंगाम नव्हता. त्यामुळे या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे प्रवासी प्रथमच येत आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजे अजूनही बंद आहेत. त्यामुळे येथे पोहोचलेल्या सुमारे ५ हजार भाविकांसाठी ही समाधी प्रमुख आकर्षण आहे.

यावेळी ही 3 प्रमुख कारणे: श्रद्धेबरोबरच अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांमुळेे चारधाम यात्रा जास्त आकर्षक

बातम्या आणखी आहेत...