आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारधाम यात्रा:यात्रेत पहिल्या दिवशी 1726 भाविकांचे दर्शन; 19 हजार ई-पास उपलब्ध, बाजारपेठ फुलली, उत्साह परतला

डेहराडून / मनमीतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा व शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थल हेमकुंड साहिबच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चारधाममध्ये पुन्हा भाविकांनी हजेरी लावली आहे. शनिवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच बाजार फुलले हाेते. हाॅटेल, स्टे हाेम व इतर प्रतिष्ठाने सुरू झाली हाेती. धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर जयघाेष निनादत हाेते. यात्रेबद्दलचा लाेकांचा उत्साह दिसून येत हाेता. पहिल्या दिवशी चारधाममध्ये १२७६ भाविकांनी दर्शन घेतले.

काेविडच्य मार्गदर्शक तत्त्वानुसार देवस्थानम बाेर्डने गर्भगृहात प्रवेशाची परवानगी दिलेली नाही. सर्वांना मंडपातूनच दर्शन घेऊन परतावे लागेल. बुधवारी नैनिताल उच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या शपथपत्रावर सुनावणी करताना यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानंतर शनिवारी स्थानिकांनी आपली प्रतिष्ठाने सुरू केली. त्यामुळे चारधामची बाजारपेठ फुलू लागली आहे. गुप्तकाशी, साेनप्रयाग, गाैरीकुंड, केदारनाथमध्ये सकाळी ९ वाजेपासून भाविकांची वर्दळ दिसून आली. बद्रिनाथ व जाेशी मठात दुपारपर्यंत भाविक येत हाेते. गंगाेत्री व यमनाेत्रीमध्ये पहिल्या दिवशी १०० हून कमी यात्रेकरू पाेहाेचले. देशभरातून सुमारे १९५०० यात्रेकरूंनी चारधाम यात्रेसाठी अर्ज केले. साेमवारपासून ते यात्रास्थळी दाखल हाेणे अपेक्षित आहे. सर्वाधिक उत्साह केदारनाथमध्ये दिसून आला. गंगाेत्री धाममध्ये लाेकांनी काेविड नियमांचे पालन करताना माता गंगेची विशेष पूजा करण्यात आली. साेबतच देशात समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही केली.

केदारनाथ धामसाठी सर्वाधिक १० हजार ई-पासचे वाटप
देवस्थानम बाेर्डच्या म्हणण्यानुसार शनिवारी चारधामसाठी १९४९१ ई-पास देण्यात आले आहेत. यमुनाेत्री धामसाठी २२७६, गंगाेत्री धामसाठी २३७५, बद्रिनाथ धामसाटी ४८३० व सर्वाधिक १०,०१० ई-पास केदारनाथ धामसाठी देण्यात आले आहेत. गंगाेत्री मंदिर समितीचे सचिव राजेश सेमवार यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, काही दिवसांत भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे चारधाममधील व्यापार पुन्हा रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...