आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठोर निर्णय घेण्याची तयारी:चारधाम यात्रा आता वर्षात एकदाच; ‘आधार’चीही नोंद

डेहराडून9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थस्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने आता उत्तराखंड सरकार चारधाम यात्रेबाबत कठोर निर्णय घेण्याची तयारी करत आहे. यानुसार आता भाविकांना वर्षातून एकदाच चारधाम यात्रा करता येणार असल्याचे उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी गुरुवारी सांगितले. तसेच भाविकांच्या आधार कार्डचीही नोंदणी होणार आहे.

मंत्री सतपाल म्हणाले की, तीर्थस्थळांवर गर्दी होत असल्याने यापुढे असा नियम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येत आहे. पुढील वर्षी चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकतो. तीर्थस्थळांवर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाची चारधाम यात्रा करण्यासाठी देशभरातून जवळपास ५० लाख भाविक पोहोचले होते. भाविकांना सर्वच बाबतीत मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे आता वर्षातून एकदाच भाविकांना चारधाम यात्रा करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...