आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये हिवाळी चारधाम यात्रेसाठी देशभरातून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. आतापर्यंत १३ हजारांहून जास्त भाविकांनी शीतकालीन पूजास्थळांचे दर्शन घेतले आहे. ही संख्या उन्हाळी यात्रेसमान नाही. मात्र, ऑल वेदर रोडचे ९०% काम पूर्ण झाल्यामुळे जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. , हिवाळ्यातही चारधामच्या गादी स्थळांवर नियमित पूजा होते.
भाविक कडाक्याच्या थंडीतही धामांतील गादी स्थळांचे दर्शन आणि पूजापाठ करून पुण्य प्राप्त करतात. ब्रद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, सर्व ऋतूत सक्षम रस्त्यामुळे आता हिवाळी यात्राही सुखकर झाली आहे. आधी जिथे मोठ्या बर्फवृष्टीमुळे रस्ते जाम होत होते. आता ही समस्या नाही. मंदिरांत भाविक सहज पूजा करू शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. चार धाम समुद्र सपाटीपासून ३हजार मीटर उंचीवर आहे. हिवाळ्यात सर्व धामांवर दहा फुटांहून जास्त बर्फ साचतो. कडाक्याच्या थंडीमुळे पौराणिक काळापासून या मंदिरांत देवांना वेगवेगळ्या ठिकाणी डोलीत नेले जाते. हिवाळ्यात बद्रीनाथच्या पूजा अर्चा गाडी स्थळ योग बद्री पांडुकेश्वर आणि जोशीमठ नृसिंह मंदिरात असते. केदारनाथ आणि मध्य महेश्वराची हिवाळ्यातील पूजा ओंकारेश्वर मंदिर उखीमठ तसेच गंगोत्री धामची मुखवालमध्ये होते. यमुनोत्री धामची पूजा-अर्चा खरसाली शनी मंदिरात होत असते.
द्वार बंद झाल्यावरही गादी स्थळांवर पूजा केली जाते
ओंकारेश्वरात मंदिरात सर्वात जास्त ११,२७५ पोहोचले
द्वितीय केदार मध्यमहेश्वराचे हिवाळी सिंहासन स्थळ ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये सर्वात जास्त ११,२७५ यात्रेकरू आले. येथे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेळाही असतो. त्यामुळे भाविक जास्त आहेत.
२०२४ पर्यंत पूर्ण होणार ११,७०० कोटींचे प्रकल्प
बद्रीनाथ धाम, केदारनाथ धाम, गंगोत्री, यमुनोत्री आणि कैलास मानसरोवर यात्रेचा काही भाग जोडणारे ९०० किमीचे प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ११,७०० कोटी रु. आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.