आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाचे आरोप:दाऊद, छोटा शकिलसह 5 जणांवर आरोपपत्र ; बेकायदा कारवायांचा आहेत आरोप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास संस्था, अर्थात एनआयएने शनिवारी कुख्यात दाऊद इब्राहिम, त्याचा सहकारी छोआ शकिल आणि अटकेत असलेल्या अन्य तिघांवर मुंबईतील विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले. जागतिक दहशतवादी कारवायांशी संबंध तसेच संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात हे आरोपपत्र दाखल झाले. भारतात डी-कंपनी नावाने दहशतवादी व गुन्हेगारी कारवायाचा केल्याचा दाऊद व त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप आहे.

गेल्या ३ फेब्रुवारी रोजी एनआयएने बेकायदा कारवाया केल्याच्या आरोपावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यात महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी कायद्यातील कलमांनुसार कलमे लावण्यात आली होती. ज्या तिघांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले त्यात आरिफ अबुबकर शेख, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहंमद सलीम कुरेशी यांचा समावेश आहे. हे तिघेही डी-कंपनीचे सदस्य असून गुन्हेगारीच्या अनेक घटनांत त्यांचा समावेश होता. या टोळीने गुन्हेगारी जगतात कारवाया करताना प्रचंड प्रमाणात खंडणी वसूल केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लोकांना दमदाटी करणे, त्यांना धमक्या देणे असे अनेक आरोप या तिघांवर आहेत. या माध्यमातून उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. एनआयएच्या प्रवक्त्यानुसार, अटक केलेल्या तिन्ही आरोपींना हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रकमा प्राप्त झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...