आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीबीआयने ३२५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर तसेच व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. भादंविचे कलम १२०-बी, ४०९ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने ९ संस्थांचाही उल्लेख केला असून यात कंपन्या व व्यक्तींचा समावेश आहे. चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेकडून मंजुरीची अनिवार्य आवश्यकता नसताना सीबीआयने मुंबईतील विशेष कोर्टापुढे अंतिम अहवाल सादर केला आहे, खटला चालवण्यास मंजुरी नाकारल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लागू होणार नाहीत. सीबीआयने कोचर दांपत्य व धूत यांना गेल्या डिसेंबरमध्ये अटक केली होती.
पत्र निदर्शनास दिले आणून सीबीआयच्या कोठडीच्या याचिकेला विरोध करताना कोचरांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी जुलै २०२१ मध्ये आयसीआयसीआय बँकेने सीबीआयला लिहिलेले पत्र कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. कोणत्याही व्यवहारात बँकेचे चुकीचे नुकसान झालेले नाही, असे या पत्रात म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.