आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचा पुत्र आशिष आणि अन्य १२ जणांविरुद्ध न्यायालयाने मंगळवारी हत्या, गुन्हेगारी कट रचण्याशी संबंधित कलमांतर्गत आरोप निश्चित केले. लखीमपूर जिल्ह्यात ३ ऑक्टोबर २०२१ रोजी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी तिकुनियातील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनीलकुमार यांनी या खटल्याची सुनावणी १६ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्याची माहिती सरकारी वकील अरविंद त्रिपाठी यांनी दिली.
घटनेनंतर पुरावे नष्ट केले त्रिपाठी म्हणाले, आशिष त्रिपाठीसह १३ आरोपींवर आयपीएस कलम १४७, १४८, १४९, ३०२, ३०७ आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातील १४ वा आरोपी विरेंद्र शुक्ला असून तो सध्या जामीनावर आहे. घटनेनंतर पुरावा नष्ट करणे आणि चुकीची माहिती दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.