आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिता भंडारी हत्याकांड:अंकिता हत्याकांडप्रकरणी 10 दिवसांत आरोपपत्र

डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण होत आला ओहे. पुढील दहा दिवसांमध्ये पोलिस आरोपपत्र दाखल करणार आहेत. अपर पोलिस महासंचालक वी. मुरूगेसन यांनी ही माहिती दिली.

निर्धारित वेळेपूर्वीच आरोपपत्र दाखल केले जाणार असून पुढील १० दिवसांमध्ये हे दाखल केले जाईल.तसेच आरोपींची नार्को चाचणीही केली जाणार आहे. नार्को चाचणीच्या परवानगीसाठी न्यायालयात लवकरच अर्ज केला जाईल, असे मुरुगेसन म्हणाले. पौडी जिल्ह्यात वनंत्रा रिसॉर्टमध्ये १९ वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिताची हत्या करण्यात आली होती. रिसॉर्टचा संचालक पुलकितने आपल्या दोन कर्मचाऱ्यांच्या साथीने तिला तलावात ढकलले होेते.

बातम्या आणखी आहेत...