आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Chargesheet Filed In Pulwama Attack Case; 19 Accused Including 7 Pakistanis; 6 Killed, 7 Arrested, 6 Absconding

पुलवामा हल्ला:आराेपपत्र दाखल; एअरस्ट्राइक बघून जैशने दुसरा हल्ला करण्याचा विचार सोडला : एनआयए

जम्मू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते
  • आराेपपत्र दाखल; 7 पाकिस्तानींसह 19 आरोपी; 6 मारले गेले, 7 अटकेत, 6 फरार

एनआयएने मंगळवारी पुलवामा हल्ल्याच्या दीड वर्षानंतर १३ हजार ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. जम्मूच्या विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्रात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा प्रमुख मसूद अजहर याच्यासह १९ जण आरोपी आहेत. अजहर, त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर अल्वी, अम्मार अल्वी आणि पुतण्या उमर फारुख मास्टरमाइंड असल्याचे म्हटले आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

एनआयएने दावा केला की, पुलवामा हल्ल्यानंतर जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. मात्र, बालाकोट एअर स्ट्राइक बघून त्याने हल्ला थांबवला. मसूद अजहर याने उमर फारुखला संदेश पाठवून हल्ला न करण्याचे सांगितले. दीड महिन्यांनी फारुख चकमकीत मारला गेला. एनआयएनुसार फारुखने दोन काश्मीर तरुणांना आत्मघाती कार बॉम्बिंगसाठी तयार केले होते.

१९ आरोपींपैकी ७ जणांना एनआयएने अटक केली असून उमर फारुखसह ७ जण मारले गेले आहेत. ६ आरोपी फरार आहेत. आरोपींपैकी ७ पाकिस्तानी आहेत. हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आणि अजहरच्या भूमिकेबाबत ठोस पुरावे असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

दहशतवाद्यांना मदत करणारेही अडकले

आत्मघाती हल्लेखोर आदिल दारला मदत करणाऱ्यांना एनआयएने आरोपी बनवले आहे. यात शाकिर बशीर, इन्शा जहां, पीर तारिक अहमद शाह, वैज उल इस्लाम, मोहंमद अब्बास राथेर, बिलाल अहमद कुचे, समीर अहमद डार, अशाक अहमद नेंगरू, आदिल अहमद दार, सज्जाद अहमद भट्ट व मुदस्सिर अहमद यांचा समावेश आहे.

हे अतिरेकी मारले गेलेत

1. आदिल अहमद दार, कारने धडक दिली. 2. मुद्दस्सीर अहमद खान, जैश अतिरेकी. 3. माेहम्मद उमर फारुख, पाकिस्तानी. 4. माेहम्मद कामरान अली, पाकिस्तानी. 5. सज्जाद भट, कार मालक. 6. कारी यासिर, जैश अतिरेकी.