आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संक्रमणामुळे अजून एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय लोकदल (RLD) प्रमुख आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.
82 वर्षीय चौधरी अजित सिंह यांनी गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमण झाले होते. यातच फुफ्फुसात संक्रमण झाल्यामुळे त्यांना निमोनियादेखील झाला होता. मागील दोन दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती.
जाट समाजाचे मोठे नेते होते चौधरी अजित सिंह
चौधरी अजित सिंह हे देशाचे माझी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे पुत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे वर्चस्व पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ते जाट समाजाचे मोठे नेते होते.
सात वेळा खासदार राहिलेले अजित सिंह यांनी केवळ काँग्रेसच नव्हे, तर भाजपची केंद्रात सत्ता असतानाही सुद्धा केंद्रीय मंत्रिपद भूषविले. व्ही.पी. सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वाणिज्य व्यापार मंत्री होते. पी.व्ही नरसिम्हा राव पंतप्रधान असताना त्यांना अन्न प्रक्रिया मंत्रालय देण्यात आले होते. तर 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते. यानंतर 2011 ते 2014 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी नागरी उड्डयन मंत्रिपद सांभाळले होते.
मागील 2 लोकसभा आणि 2 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. याच कारणामुळे, चौधरी अजित संह यांचा 2019 लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या बागपतमधून आणि त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांचा मथुरा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.