आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cheap Green Energy Despite The Crisis! Power Generation By Pump Store Power Station In Rajasthan

दिव्‍य मराठी ब्रेकिंग:संकट आले तरीही स्वस्तात हरित ऊर्जा! राजस्थानात पंप स्टोअर पॉवर स्टेशनने वीजनिर्मिती

दिलीप वधवा | रावतभाटा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानात प्रथमच बंधारे, जलाशयांवर पंप स्टोअर पॉवर स्टेशन तंत्रज्ञानाने वीजनिर्मिती होणार आहे. चंबळ नदीच्या जवाहर सागर बंधाऱ्यापासून हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी पूर्णत्त्वाकडे आहे. त्यामुळे पीक अवरमध्ये जवळपास २०० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल. जास्त मागणी वा वीज संकट असतानाही या प्रोजेक्टमधून स्वस्त आणि हरित ऊर्जा पुरवठा करता येईल. खरे तर ही योजना १९८५ मधील. आता राज्यात वीज संकट आणि हरित ऊर्जेच्या मुद्द्यावरून दबाव वाढल्यानंतर प्रोजेक्ट कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विद्युत उत्पादन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच चंबळ नदीच्या जवाहर सागर परिसरात पाहणी केली. तेथे पंप स्टोअर पॉवर स्टेशन सुरू होत आहे.

पंपाने पाणी उपसणार, तरीही वीज स्वस्तच : पंप विद्युत घरातून सोडलेल्या पाण्याला पुन्हा उपसून ते इनटेकवेलमध्ये सोडण्यात येईल. त्यासाठीही विजेचा खर्च होईल. तरीही मिळणारी वीज स्वस्त असेल.

देशभर असे ६ पॉवर स्टेशन बनवणार : पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात ६ पंप स्टोअरेज पॉवर स्टेशन प्रोजेक्टमधून वीजनिर्मिती सुरू आहे. ऑस्ट्रेलियन जाणकारांच्या अहवालानुसार भारतात या प्रकल्पाला प्रचंड वाव आहे.

बातम्या आणखी आहेत...