आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Check Out The BJP Leaders' Hate Speech Case; Congress Demands Letter To Zuckerberg

सोशल मीडिया:भाजप नेत्यांच्या हेट स्पीच प्रकरणाची चाैकशी करा; काँग्रेसची झुकेरबर्गकडे पत्र पाठवून मागणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकच्या नि:पक्षतेच्या मुद्द्यावरून सरकार व विरोधकांत तणाव वाढला

भाजप नेत्यांच्या हेट स्पीचप्रकरणी काँग्रेसने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, याप्रकरणी काँग्रेस निराश आहे. फेसबुक मुख्यालयाने याची उच्चस्तरीय चौकशी करून एक किंवा दोन महिन्यांत चौकशी अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाला द्यावा. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत फेसबुकच्या भारतीय शाखेची जबाबदारी नव्या टीमकडे देण्यात यावी. यामुळे चौकशीवर परिणाम होणार नाही. काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ई-मेलद्वारे हे पत्र झुकेरबर्ग यांना पाठवले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हे पत्र ट्विट करत म्हटले आहे की, मोठ्या संकटानंतर आपण ही लोकशाही मिळवली आहे. एखादा पूर्वग्रह, खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणाऱ्या भाषणातून यात बदल करेल हे आपण सहन करणार नाहीत. अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने हे प्रकरण काढले आहे. आता आपण सर्व भारतीयांनीही प्रश्न विचारण्याची गरज असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

शिवसेना म्हणते-पक्ष कोणताही असो, दुर्लक्ष नको

शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रात लिहिले, फेसबुकसारख्या कंपन्या द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्तारूढ पक्षातील आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. व्यावसायिक नियम आणि नैतिकतेचे फेसबुकला पालन करावेच लागेल. एकमेकांना बदनाम करण्याचा सोशल मीडियावर धंदा झाला आहे. यासाठी पैसे दिले जात आहेत.

भाजप म्हणाला- काँग्रेसकडे मुद्दाच राहिलेला नाही

भाजप नेते आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका मुलाखतीत काँग्रेसला टोला लगावला. त्यांनी सांगितले, लोकांना फेस न दाखवणारे फेसबुकवर आरोप करत आहेत. २०१९ मध्ये लोकांनी काँग्रेसला सत्तेत पुन्हा आणण्यास नकार दिल्याने त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा काढला. आता काँग्रेसकडे काहीच नसल्याने ते खोटा आरोप करत आहेत.

फेसबुकच्या पॉलिसी संचालकांवर एफआयआर, तक्रारदारावर आधीच दाखल आहे गुन्हा

छत्तीसगड पोलिसांनी रायपूरच्या एका पत्रकारास धमकी दिल्याच्या आरोपात फेसबुकच्या धोरण संचालक आंखी दाससह इतर तिघांवर एफआयआर दाखल केला. रायपूरचे एसएसपी अजयकुमार यादव यांनी याची पुष्टी केली आहे. तक्रारदार पत्रकार आवेश तिवारी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी फेसबुकवर वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तावर टिप्पणी करत एक पोस्ट केली होती. तेव्हापासून त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळतेय. याआधी आंखी दास यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले होते की, त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या तक्रारीत तिवारीचे नावही आहे.

फेसबुक : ११ वर्षांत खासगी माहिती ते निवडणुकीत हस्तक्षेप

> 2010 : वॉशिंग्टनच्या युजरची खासगी माहिती परवानगी शिवाय पोस्ट. फेसबुक दोषी. तडजोडीचे आदेश.

> 2014 : ऑस्ट्रियात युजर मॅक्स श्रीम्सने फेसबुकविरोधात गोपनीयता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. समर्थनात २५ हजार युजर्स जमले. कोर्टाने फेसबुकला दोषी धरले.

> 2015 : अमेरिकेत युजर्सची बायोमेट्रिक माहिती गोळा केल्याचा गुन्हा. फेसबुकने युजर्ससोबत सुमारे ४८७५ कोटी रुपयांत प्रकरण मिटवले.

> 2018 : फेसबुकवर ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म केम्ब्रिज अॅनालिटिकाला ८.७ कोटी युजर्सची माहिती लीक केल्याचे आरोप सिद्ध झाले. यूएस फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर ३४ हजार कोटी रुपयांचा दंड लावला. या माहितीचा वापर २०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी करण्यात आला. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गला संसदेत हजर व्हावे लागले. आकड्यांच्या दुरुपयोगाचा जोखिमेशी संबंधित चुकीची माहिती दिल्याने ७५० कोटी रुपयांचा दंडही झाला. 2018: फेसबुकवर अॅपल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसहित ६० फोन उत्पादकांसोबत माहिती देण्यासाठी करार केल्याचा आरोप झाला.

> 2020 : वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तांत आरोप- फेसबुकने हेतुपुरस्सर भाजप नेत्यांचे हेट स्पीच लवकर हटवले नाहीत.

> जुलैत अमेरिकी संसदेच्या समितीने फेसबुक, गुगल, अॅपल, अॅमेझॉनच्या सीईओंना बोलावले होते.

बातम्या आणखी आहेत...