आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cheerharan Posters Up In Varanasi With Kangana As Draupadi, Uddhav Thackeray As Dushasan, PM Modi As Lord Krishna

वाराणसीत 'चीरहरण'चे पोस्टर:कंगना द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुशासन तर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीकृष्णाच्या रुपात, महाराष्ट्र सरकार कंगनासोबत 'कौरव सेना' प्रमाणे वागत असल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या पोस्टरमध्ये महाभारतातील चीरहरणचे चित्र दाखवण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. बीएमसीने कंगना रनोटच्या कार्यालयाची इमारत अनधिकृत असल्याचे घोषित करत त्याची तोडफोड केली. यानंतर महाराष्ट्र सरकारवर देशभरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान आता वाराणसीत एका स्थानिक वकिलाने वादग्रस्त 'चीरहरण'चे पोस्टर लावले आहे.

या पोस्टरमध्ये महाभारतातील चीरहरणचे चित्र दाखवण्यात आले आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनोटला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दुशासन तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीकृष्णाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊतही या पोस्टरमध्ये दिसत आहेत. ते या सर्व दृष्यांवर हसत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हे पोस्टर वाराणसीचे एक स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांना लावले होते. हे पोस्टर योग्य असल्याचे सांगत मिश्रा म्हणाले की, शिवसेनेसोबत कंगनाच्या असलेल्या भांडणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार हे 'कौरव सेना' प्रमाणे काम करत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील महिलांच्या सन्मानाची संरक्षण करु शकतात. यामुळे त्यांचा उल्लेख श्रीकृष्ण असा करण्यात आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि वादाला सुरूवात झाली.

यानंतर मी मुंबईत येतेय रोखून दाखवा असे म्हणत कंगनाने शिवसेनेला आव्हान दिले होते. याच काळात बीएमसीने कंगनाचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत ती मुंबईत येण्यापूर्वीच कार्यालयावर हतोडा चालवला. यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला. शिवसेना ही कारवाई सूडभावनेतून करत असल्याची टीका विरोधीपक्षाकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...