आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलेल्या आफ्रिकन चित्त्यांनी पहिली शिकार केली. दोन्ही चित्त्यांनी तब्बल 48 तासांनंतर एका चितळाची शिकार केली. कुनो नॅशनल पार्क व्यवस्थापनाने सोमवारी ही माहिती दिली.
दोन्ही चित्ते निरोगी असल्याचे उद्यान व्यवस्थापनाने सांगितले. ते एका भल्या मोठ्या आवारात फिरत असतात. डीएफओ प्रकाश वर्मा यांनी सांगितले की, टीम सतत कॉलर आयडी, सीसीटीव्ही आणि ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे.
17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते आणण्यात आले होते. चित्त्यांना लहान आवारात वेगळे ठेवण्यात आले होते. जिथे त्यांना रोजचे अन्न दिले गेले. सुमारे 50 दिवसांनंतर शनिवारी दोन नर चित्त्यांना एका मोठ्या आवारात सोडण्यात आले. दोन चित्त्यांना मोठ्या एन्क्लोजरमध्ये सोडण्यापूर्वी चित्ता टास्क फोर्सची बैठक झाली. टास्क फोर्सच्या सदस्यांच्या संमतीनंतर चित्त्यांना सोडण्यात आले.
चित्ता शिकार करून पोट भरू शकतो
डीएफओ वर्मा यांनी सांगितले की, प्रदीर्घ कालावधीनंतर देशाच्या मातीत आणलेल्या चित्त्यांनी प्रथमच शिकार केली आहे. आता ते स्वतः त्यांच्या आवडत्या प्राण्याची शिकार करून पोट भरू शकणार आहेत. इतर सहा चित्त्यांना सोडण्याचा निर्णय चीता टास्क फोर्स घेणार आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे.
70 वर्षांनंतर चित्त्यांचे भारतात आगमन
भारताची 70 वर्षांची प्रतीक्षा संपली. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉक्स उघडून क्वारंटाइन एनक्लोजरमध्ये तीन चित्ते सोडले होते. मोदींनी काही फोटोही क्लिक केले. 500 मीटर चालत मोदी स्टेजवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होते. चित्ता मित्र टीमच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला. येथे वाचा पुर्ण बातमी
चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी
चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. हेच या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.दिव्य मराठी एक्सप्लायनरमध्ये आपण चित्त्यांना हा वेग कसा मिळतो, या वेगासाठी त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागते... हे सर्व जाणून घेऊया.. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.