आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chennai Port Has 700 Tons Of Ammonium Nitrate For The Last 5 Years; Soon E auction: Officers

साठा:चेन्नई पोर्टवर गेल्या 5 वर्षांपासून आहे 700 टन अमोनियम नायट्रेट; लवकरच ई-लिलाव : अधिकारी

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमोनियम नायट्रेट काय आहे?

तामिळनाडूच्या चेन्नई पोर्टवरील कंटेनर डेपोत गेल्या ५ वर्षांपासून ७०० टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी एकच खळबळ उडवून दिली. नंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करताना म्हटले, २०१५ मध्ये शिवकाशीतील एका आयातदाराने दक्षिण कोरियातून ६९७ टन अमोनियम नायट्रेट मागवले होते. याची किंमत १.८ कोटी रुपये होती. ते ३७ कंटेनरमध्ये असून सुरक्षित आहे. २०१५ मध्ये मुसळधार पावसात ७ टन अमोनियम नायट्रेट खराब झाले. ६९० टन चांगल्या स्थितीत आहे.

आयातदाराने हा अमोनियम नायट्रेटचा साठा खताच्या ग्रेडचा आहे, अशी चुकीची माहिती दिली होती. प्रत्यक्षात तो स्फोटकाच्या स्वरूपात असल्याचे आढळले. त्याच्याकडे या केमिकलसाठी वैध परवाना नसल्याने तो साठा जप्त करण्यात आला. केंद्रीय अप्रत्यक्ष कर सीमा शुल्क मंडळाने हा साठा जप्त करण्याचे तसेच ४८ तासांत या स्फोटकांची सर्व माहिती देण्याचे आदेश दिले.

अमोनियम नायट्रेट काय आहे?
साधारण परिस्थितीत हे खत आहे. शुद्ध अमोनियम नायट्रेट, पांढरा, विरघळणारा दाणेदार पदार्थ आहे. याला १७० अंश से. तापमानात गरम केल्यास अथवा दबाव वाढवल्यास तो स्फोटक ठरतो.

खत स्वरूपातील अमोनियम नायट्रेटचा आपोआप स्फोट होतो का?
आपोआप स्फोट हाेणार नाही. परंतु त्याला १७० अंश से. पेक्षा जास्त तापमान अथवा इंधन मिळाल्यास स्फोटक ठरू शकतो.

स्फोटकात किती प्रमाण असते?
कोणतेही मिश्रण, जेलीमध्ये ४५% पेक्षा अधिक अमोनियम नायट्रेट असेल तर एक्सप्लोझिव्ह अॅक्ट-१८८४ नुसार तो पदार्थ स्फोटके मानला जातो.

याचे अन्य उपयोग काय?
हा खते, बेशुद्ध करण्याचा वायू व कोल्ड पॅक आदीच्या निर्मितीत प्रमुख घटक म्हणून याचा वापर केला जातो.

कोणत्या नियमात परवाना मिळतो?
अमोनियम नायट्रेटची विक्री अथवा उपयोगासाठी निर्मिती, रूपांतर, स्टिअरिंग व बॅगिंग, आयात, निर्यात, साठवण म्हणून अमोनियम नायट्रेट नियम २०१२(एक्सप्लोझिव्ह अॅक्ट-१८८४ अंतर्गत तयार केलेले) अंतर्गत पेसो (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्हज सेफ्टी आॅर्गनायझेशन) व डीआयपीपीप्रमाणे (औद्योगिक परवाना) दोन प्रकारचे परवाने घेणे आवश्यक आहे.

अमोनियम नायट्रेटची सुरक्षा ठरवण्याची जबाबदारी कोणाची?
ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे.

आरोग्यावर याचा काय परिणाम होतो?
त्वचा व डोळ्याला लागल्यास जळजळ होते. श्वासात गेल्यास खोकला येतो. गंभीर परिणामही होऊ शकतात.

देशात अमोनियम नायट्रेटचे उत्पादन (वार्षिक सरासरी अंदाज)
20 हजार मेट्रिक टन अमोनिियम नायट्रेट आयात केले
6 लाख मेट्रिक टनांची गरज स्फोटकांच्या उद्योगाला
11,400 मेट्रिक टन न्यूक्लियर फ्युएल काॅम्प्लेक्सपासून निघणाऱ्या गाळातून अमोनियम नायट्रेट काढण्याची क्षमता
10.54 लाख मेट्रिक टन, ५ प्रमुख निर्मात्यांची क्षमता
1.97 लाख मेट्रिक टन कन्व्हर्टर्स निर्मितीची क्षमता

बातम्या आणखी आहेत...