आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोलकात्याच्या गरियाहाट उड्डाणपुलाखाली दुपारनंतर 3 ते 9 वाजेपर्यंत रोज मन लावून लढतात ‘शतरंज के खिलाडी’

कोलकाता (सोमा नंदी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरियाहाट बुद्धिबळ क्लबमध्ये सध्या 100 हून अधिक सदस्य, दरवर्षी 3 स्पर्धा
  • उड्डाणपुलाखाली रोज सजतात बुद्धिबळाचे डाव, सरासरी 50 खेळाडू लावतात डाव

बंगालचे नामांकित चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी १९७७ मध्ये “शतरंज के खिलाडी’ हा चित्रपट झळकावला होता. बुद्धिबळाची आवड असलेल्या दोन जमीनदारांभोवती हे कथानक फिरत राहते. असेच वेडे बुद्धिबळपटू तुम्हाला पाहावयाचे असतील तर मग सरळ कोलकात्यात यायला हरकत नाही.

स्थान -गरियाहाट उड्डाणपूल, वेळ - रोज दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत. येथे उड्डाणपुलांच्या रेलिंगला लागून असे आठ खुले टेबल लावलेले आहे. २६ स्टूल आणि १३ टेबलांवर झुलणारे दिवे प्रकाश पुरवतात. येथे येण्यास कुणालाही मज्जाव नाही. कुणी कुणाला अडवतही नाही. म्हणूनच रोज दुपारपासूनच येथे बुद्धिबळाची आवड असलेल्यांची रेलचेल असते. यात खेळणारे आणि डाव पाहण्याच्या उत्सुकतेपोटी आलेले प्रेक्षकही असतात. येथे वय, कौशल्य, पात्रता हे परिमाण कुणीच पाहत नाही. आपल्या इच्छेनुसार प्रतिस्पर्धी निवडून कुणीही येथे बसून खेळू शकतो. लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा भेदच नाही. सरासरी या वेळेत ५० खेळाडू कायम दिसतातच.

या आगळ्यावेगळ्या खिलाडूवृत्तीची सुरुवात १९८७ मध्ये झाली. येथून काही अंतरावर खादीचे दुकान आहे. तेथे फेरीवाल्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडणे सुरू केले. नंतर २००६ मध्ये उड्डाणपूल झाला. हे शौकीन खेळाडू आता पुलाखाली बसू लागले. जवळच “मेघमल्हार’ इमारतीत राहणारे देवाशिष बसू यांनी ते पाहिले आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत गरियाहाट चेस क्लब स्थापन केला. आज या क्लबचे १०० सदस्य आहेत. दरवर्षी तीन स्पर्धाही होतात. दोन स्पर्धा सदस्यांसाठी आणि एक खुली. यंदा २१ फेब्रुवारीच्या स्पर्धेत २०० स्पर्धक होते.

शहरातील हॉकर्स युनियनचे नेते अभिजित डे गरियाहाट क्लबचे सचिव आहेत. ते सांगतात, “ग्रँडमास्टर दीप्तायन घोष, सायंतन बोस याच क्लबमधून बाहेर पडले. नोव्हेंबर २०१९ मध्ये चिनी ग्रँडमास्टर डिंग लिरेन व अमेरिकी हिकारू नाकामुरा येथे आले होते. दिब्येंदू बरुआ, तानिया सचदेव या क्लबचे सदस्य आहेत.’

बातम्या आणखी आहेत...