आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:श्रीनगरमध्ये मराठी अधिकाऱ्याने बांधले छत्रपती शिवाजी हाऊस

श्रीनगर / सतीश वैराळकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बटमालू गावचे मैदान म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्या सैन्यातील घोडे थांबण्याचे ठिकाण होते. टट्टू ग्राउंड म्हणून त्याचा इतिहासात उल्लेख आहे. बटमालूच्या या ऐतिहासिक शंभर एकर जागेवर आता सैन्यदलांच्या छावण्या मोठ्या दिमाखात उभ्या आहेत. सशस्त्र सीमा दलाच्या दहाव्या बटालियनचा विस्तार बारा एकर जागेवर आहे. श्रीनगर शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या या जागेवर मराठी कमांडंट संजय ज्ञानदेव शेरखाने यांनी छत्रपती शिवाजी हाऊसची निर्मिती केली आहे. लवकरच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसवला जाणार आहे.

जम्मू-काश्मीर राज्याचे शेवटचे राजे महाराजा हरिसिंग यांच्या सैन्यातील घोडे, खेचर व अन्य प्राणी थांबवण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या शंभर एकर मैदानाची निवड केली होती. येथे डोगरा आर्मीचे सैनिकही थांबत असल्याची नोंद श्रीनगर गॅझेटमध्ये आहे. याला काश्मिरीमध्ये चांदमारी असे संबोधले जायचे. त्याचा अर्थ फायरिंग रेंज असा होतो. बंदुकीच्या गोळीबाराचा सराव करण्यासाठी मैदानाचा काही भाग राखून ठेवला होता. बटमालू नावाचे खेडे तेथे होते व नंतर व्हॉलीबॉल व फुटबॉल खेळासाठी याचा वापर होत असे.

बातम्या आणखी आहेत...