आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh Bijapur Encounter Update; Naxalites Released Photo Of Hostage CRPF Jawan

नक्षलवाद्यांच्या ताब्यात CRPF जवान:विजापूर हल्ल्यानंतर ओलीस ठेवलेला जवान सुरक्षित, नक्षलवाद्यांनी फोटो जारी करुन दिली माहिती

विजापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोब्रा बटालियनच्या राकेश्वर सिंह यांचा फोटो दाखवून नक्षलवादी म्हणाले- तो आमच्याकडे सुरक्षित

3 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेला CRPF जवान राकेश्वर सिंह सुरक्षित असून, नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. नक्षलवाद्यांनी त्याचा फोटो जारी करुन तो सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. फोटोमध्ये कोबरा बटालियनचे जवान राकेश्वर सिंह नक्षलवाद्यांच्या कँपमध्ये बसलेले दिसत आहेत.

दरम्यान, रामेश्वर यांचा फोटो समोर आल्यानंतर ते जगरगुंडा परिसरात असल्याशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, तो परिसर गाव, जंगल आणि डोंगरांच्या आसपास असल्याचेही म्हटले जात आहे.

जवानाच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी मागितली मध्यस्थींची नावे
नक्षलवादी सतत दावा करत आहेत की, रामेश्वर त्यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यांना व्हॉट्सॅप कॉलद्वारे रामेश्वर त्यांच्या ताब्यात असल्याचे म्हटले होते. याशिवाय, नक्षलवाद्यांनी काल एक प्रेस नोट जारी करुन सरकारला मध्यस्थींची नावे जाहीर करण्यास सांगितले होते. मध्यस्थींची नावे जाहीर झाल्यानंतर रामेश्वरला सोडण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...