आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगड राज्यातील विजापूरमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, चकमकीमध्ये सीआरपीएफचे चार जवान आणि डिआरजीचा एक असे एकूण पाच जण शहीद झाले. यासोबतच नक्षलवाद्यांपैकी तीन जणांचा समावेश असून यामध्ये एका महिला नक्षलवादीचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिक्षक कमल लोचन यांनी सांगितले की, सध्या सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरु असून यामध्ये अजून काही जवान गंभीर असल्याचे माहित मिळत आहे. ही घटना विजापूरमधील टेरिम पोलिस स्टेशनच्या परिसरातील झीरम हल्लाचा मास्टरमाइंड हिडमाच्या गावात सुरु आहे.
यामध्ये सामील नक्षलवादी या टीमचे सदस्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावात बरेच नक्षलवाद्यांची जमावजमव सुरु असल्याची बातमी सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार ही टीम त्यांच्या शोधासाठी बाहेर पडली होती.
छत्तीसगडमधील ही 10 दिवसांतील दुसरी घटना असून यापूर्वी 23 मार्चला झालेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांनी नारायपूरमध्ये आयईडी स्फोटातून हा हल्ला घडवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.