आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजापूरमधील तर्रेम भागात नक्षलवादी आणि सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत 23 सैनिक शहीद झाले होते. बेपत्ता सैनिकांची माहिती नक्षलवाद्यांनी प्रसार माध्यमांना व्हॉट्सॲप कॉल करुन दिली आहे. यावेळी बेपत्ता सैनिक सुरक्षित असून, तो त्यांच्या ताब्यात असल्याचेही नक्षलवाद्यांनी सांगितेल आहे. बेपत्ता सैनिकाचे नाव राकेश्वर सिंह मनहास असून तो जम्मू-कश्मीर येथील रहिवाशी आहे.
नक्षलवाद्यांनी पुढे सांगितले की, तो सैनिक आमच्या ताब्यात असून त्याला कोणत्याच प्रकाराचा नुकसान पोहचवणार. विजापूरचे पोलिस अधिक्षक कमल लोचन यांनी या सैनिकाचे लोकेशन मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
या चकमकीत 23 सैनिक शहीद झाले होते. यामधील 20 सैनिक बेपत्ता होते परंतु, नंतर त्यांना हवाई दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते. त्यातील एक सैनिक शेवटपर्यंत बेपत्ता होता.
ऑपरेशनमधून परत येताना झाला हल्ला
जखमी एएसआय आनंद कुसाम सांगितले की, आम्ही 450 सैनिकांची टीम दिलेले ऑपरेशन पूर्ण करुन परत येत होती. दरम्यान, 700 नक्षलवाद्यांनी आम्हाला घेरुन सलग चार तास गोळीबार केला.
ग्राउंड झीरोवर पोहचली दिव्य मराठी, गावात प्रत्येक ठिकाण होते सैनिकांचे मृतदेह
नक्षलवादी चकमकीच्या दुसऱ्या दिवशी कठीण प्रवास पूर्ण करत दिव्य मराठीची टीम ग्राउंडवर पोहचली. दरम्यान, या गावात 60-70 नक्षलवादी होते. त्यांनी लगेच चौकशी करायला सुरुवात केली, परंतु, माध्यमांतील लोक आहेत हे कळल्यावर ते शांत राहिले. याप्रसंगी नक्षलवाद्यांनी गावातील लोकांकडे हात दाखवत त्यांच्यासोबत जाण्यास सांगितले. जेव्हा टीम पुढे जात होती तेव्हा संपूर्ण गावाच्या प्रत्येक ठिकाणी सैनिकांचे मृतदेह आढळले. नक्षलवाद्यांनी सैनिकांच्या शरिरावरील जॅकेट, शूज आणि इतर शस्त्रे घेऊन गेल्याचे निदर्शनास आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.