आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगड राज्यातील विजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत 23 सैनिक शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक दिवसाचा छत्तीसगड दौरा आयोजित करण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनी येथे आल्यानंतर सर्वात आधी चकमकीत शहीद झालेल्या सैन्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. गृहमंत्री शहा हे बैठक झाल्यावर बासागुडा येथील सीआरपीएफ कँपला भेट देणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गृहमंत्री अमित शहा हे श्रद्धांजली कार्यक्रम आटोपल्यानंतर रायपूर येथे जाऊन जखमी सैनिकांनी भेटणार आहे. त्यांनतर शहीद सैनिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे. मुख्यंमत्री भूपेश बघले म्हणाले की, ही लढाई नसून एकप्रकारचे युद्धच होते. आपल्या सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या घरात घूसून त्यांना मारले आहे.
शाह रविवारी बघेल यांच्याशी बोलले
विजापूरमधील चकमकीत 23 सैनिक शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनव्दारे बोलले होते. संबंधित घटनेचे सविस्तरपणे चौकशी करत केंद्राकडून काही गरज पडल्यास ती राज्याला मिळेल असे शहा यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंह यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.