आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh Wife Murder; Wife Killed In Pieces By Husband | Note Printing Machine | Chhattisgarh

पत्नीची हत्या करून 6 तुकडे केले:2 महिन्यांपासून पाण्याच्या टाकीत लपवला होता मृतदेह, घरात आढळली नोटा छापण्याची मशीन

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनावट नोटा हस्तगत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी 2 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा खुलासा केला.  - Divya Marathi
बनावट नोटा हस्तगत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी 2 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा खुलासा केला. 

विलासपूरमध्ये एक थक्क करणारी गोष्ट घडली आहे. पोलिसांनी बनावट नोटांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी एका तरुणाच्या घरी छापेमारी केली. तिथे त्यांना बनावट नोटा छापणाऱ्या नोटांसह एका महिलेचे 6 तुकडे करण्यात आलेला मृतदेह आढळला. ही डेडबॉडी पाण्याच्या टाकीत ठेवण्यात आली होती. आरोपीने सांगितले, त्याने 2 महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर तिचे तुकडे करून ते टाकीत लपवले होते. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचा दावा आरोपीने केला.

पोलिस आरोपीच्या घरी धाड टाकण्यासाठी पोहोचले तेव्हा तिथे सर्वत्र दुर्गंध पसरल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी सिटेंक्सच्या टाकीचे झाकण उघडले असता त्यांचे डोळेच पांढरे झाले. टाकीत महिलेचे तुकडे आढळले. आरोपी पवनने सांगितले की, हा मृतदेह त्याची पत्नी सती साहूचा आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून चौकशी सुरू केली आहे. ​​​​​​​

आरोपीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे पॉलिथीनमध्ये गुंडाळून टेपने पॅक केले होते.
आरोपीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे पॉलिथीनमध्ये गुंडाळून टेपने पॅक केले होते.

सकरी टीआय सागर पाठक यांच्या माहितीनुसार, पोलिसांना उसलापूर रेल्वे स्थानकामागे राहणारा पवन सिंह ठाकूर बनावट नोटांचा अवैध व्यापार करत असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या उसलापूर ओव्हरब्रिजजवळ बनावट नोटांसह मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता, तिथे् 500 व 200 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आढळले. ​​​​​​​

आरोपी पत्नी व 2 मुलांसह एनटीपी कर्मचारी निर्दोष एक्काच्या घरात भाड्याने राहत होता.
आरोपी पत्नी व 2 मुलांसह एनटीपी कर्मचारी निर्दोष एक्काच्या घरात भाड्याने राहत होता.

चारित्र्यावरील संशयामुळे केली हत्या

चौकशीत आरोपी पवन सिंहने सांगितले की, तो पत्नी व 2 मुलांसह राहत होता. त्याची मोठी मुलगी 5, तर मुलगा 3 वर्षांचा आहे. तो एनटीपी कर्मचारी निर्दोष एक्का यांच्या घरी भाड्याने राहतो. सीसीटीव्ही कॅमेरा ऑपरेटिंग व रिपेयरिंगचे काम करत होता. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला होता. त्यामुळे गत 5 जानेवारी रोजी त्याने तिची हत्या केली. ​​​​​​​

या सनसनाटी घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या सनसनाटी घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपीने केले होते लव्ह मॅरेज

आरोपी पवन सिंह ठाकूर पत्नी सती साहूशी लव्ह मॅरेज केले होते. त्यामुळे मुलीच्या माहेरच्यांनी मुलीसोबतचे संबंध तोडले होते. घटनेच्या 2 महिन्यांनंतरही महिलेच्या माहेरच्यांनी तिचा शोध घेतला नाही. एवढेच नाही तर आसपासच्या लोकांनाही या घटनेची कोणतीही खबरबात मिळाली नाही. आरोपीने कामाचे कारण सांगून मुलांना गावी आपल्या आई-वडिलांकडे पाठवले होते.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पवन सिंहने गत 5 जानेवारी रोजी पत्नीची हत्या केली होती.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पवन सिंहने गत 5 जानेवारी रोजी पत्नीची हत्या केली होती.

पोलिस चौकशीत असे आढळले की, पवन सिंहची पत्नी सती साहू मुंगेलीच्या दाऊपारा येथील होती. जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झोलाी. लग्नानंतर दोघेही उसलापूर येथे राहत होते. ​​​​​​​

पोलिसांनी आरोपी पवन सिंह ठाकूरसह त्याच्या सहकाऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी त्याच्यासोबत बनावट नोटांचा गोरखधंदा करत होते.
पोलिसांनी आरोपी पवन सिंह ठाकूरसह त्याच्या सहकाऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी त्याच्यासोबत बनावट नोटांचा गोरखधंदा करत होते.

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

यासंबंधीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपी पवनसिंह ठाकूरसह त्याच्या अन्य सहकाऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्वजण बनावट नोटांचा गोरखधंदा करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस यासंबंधी मोठा खुलासा करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...