आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh : Bus Full Of Jharkahnd Laborers Returned From Pune Due To Covid 19 Collided With A Truck On The National Highway In Bemetra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेमेतरा:पुण्यावरुन झारखंडला जाताना मजुरांनी भरलेल्या बसला कोळशाने भरलेल्या ट्रेलरची जोरदार टक्कर; ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू, 23 जखमी

बेमेतराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेमेतरामधील नांदघाट परिसरातील रायपूर-बिलासपूर हायवेवर सकाळी झाला अपघात

छत्तीसगडच्या बेमेतराजवळील रायपूर-बिलासपूर हायवेवर गुरुवारी सकाळी पुण्यावरुन झारखंडला जात असलेल्या मजुरांनी भरलेल्या बसला ट्रेलरने जोरदार टक्कर मारली. ही धडक इतकी भीषण होती की, बस चकनाचुर झाली. या अपघातात बस चालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले. जखमींपैकी 5 जणांची परिस्थिती चिंताजनक आहे. अपघातानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवशांना बाहेर काढले. सर्व जखमींना बिलासपूर आणि नवागडच्या हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन झारखंडच्या मजुरांना घेऊन बस गुरुवारी सकाळी 8.30 वाजता बिलासपूरकडे जात होती. अपघातावेळी बस रायपूर-बिलासपूर हायवेवरील नांदघाटजवळील टेमरी गावात पोहचली होती. तेव्हा कोलशाने भरलेल्या ट्रेलरने बसला जोरदार टक्कर मारली. अपघातात बस चकनाचुर झाली. यात तिघांचा मृत्यू झाला तर 23 जखमी झाले. 

ढाब्यांमुळे ट्रकची लाइन लागली आणि वन-वे झाला हायवे

अपघाताचे मुख्य कारण म्हणजे, ट्रकांमुळे झालेला वन-वे रस्ता. स्थानिकांचे म्हणने आहे की, सरकारने ढाबे उघडण्यास परवानगी दिली, पण पार्किंगची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांब रांग लागली आणि हायवेचे वनवेमध्ये रुपांतर झाले. त्यामुळेच दोन्ही वाहनांची समोरा-समोर टक्कर झाली. 

बातम्या आणखी आहेत...