आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका मुख्याध्यापकाला काठीने मारहाण करून त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपींनी त्या मुख्याध्यापकांचा मृतदेह पुरून टाकला. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बलोद बाजार समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून शिक्षक बेपत्ता होता. हे प्रकरण अखेर सोमवारी उघडकीस आले. कसडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. शांतीलाल पटले असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
कसडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खम्हरिया गावातील रहिवासी शांतीलाल पटले (वय -45) हे करदा येथील प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक होते. पत्नी सविता पटले आणि दोन मुलांसह ते राहत होते. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शांतीलाल पटले हे बेपत्ता झाले होते. कुणालाही काही कळत नव्हते. नेमके शांतीलाल कुठे गेले त्याचा पत्ता लागत नव्हता. अखेर सविता पटले यांनी पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली.
शांतीलाल यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, पती 28 डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. पण तेव्हापासून त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. फोन बंद येत आहे. आजूबाजूच्या लोकांशी बोललो. मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यावर पोलिसांनी मुख्याध्यापक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलीस तपास करत होते. तेव्हाच पोलिसांना माहिती मिळाली की, मुख्याध्यापक संजय श्रीवास्तव आणि सृजन श्रीवास्तव या कसडोल येथील रहिवासी यांच्यासोबत शेवटचे दिसून आले. तेव्हापासून शांतीलाल बेपत्ता झालेले आहे. त्यावर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, मात्र त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, या आरोपींवर पोलिसांना संशय होता, कारण संजय श्रीवास्तव हा नेहमीच आगाऊ कामे करित असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. तो अनेकदा तुरुंगात गेला आहे. पोलिसांची चौकशी सुरूच राहिली. थर्ड डीग्री दिली असता संजय श्रीवास्तव यांने खूनाची कबुली दिली. आरोपी संजयने सांगितले की, मी अनेकदा तुरुंगात गेलो आहे. यावर शांतीलाल मला म्हणत असे, तू असे का करतोस, तुरुंगात का जातोस. यावरून आमच्यात शिवीगाळही अनेकदा झाली. त्या दिवशी देखील तसाच प्रकार घडला. म्हणून त्याचा काटा काढला.
रुमालाने गळा दाबला
आरोपी संजय श्रीवास्तव याने सांगितले की, मुख्याध्यापक शांतीलाल मला नेहमी टोकत असे, त्यामुळे मला राग येत असे. अनेकदा वाद झाला. म्हणूनच मी त्याला मारण्याचा प्लॅन बनवला आणि 28 डिसेंबरला माझा साथीदार सृजन याच्या मदतीने शांतीलाल कडे गेलो. काहीतरी बहाणा करून आम्ही त्याला आमच्यासोबत आणले. यानंतर बोलत असताना आम्ही त्याला जंगलाच्या दिशेने नेले. येथे आम्ही त्याला काठीने मारहाण केली. तरीही तो मेला नाही, मग आम्ही त्याचा रुमालाने गळा दाबला.
पुढे बाबा सोनाखान रोडवरील पोडी गावसमोरील रस्त्याच्या कडेला पोहोचलो. रस्त्याच्या कडेला खड्डा पडलेला होता. आम्ही त्यांचा मृतदेह तिथेच पुरला. त्यानंतर मोबाईल बंद करून सोबत ठेवला. यानंतर त्याचा एक साथीदार भागवत दास (23) याला बोलावून त्याची कार बिलासपूरला पाठवली. भागवत याने मुख्याध्यापकाच्या गाडीतून बिलासपूर येथे ओसाड असलेल्या जागेत कार सोडून दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी रविवारी मुख्याध्यापकाचा मृतदेह बाहेर काढले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.