आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:ट्रकची-कारला धडक, एकाच कुटुंबातील 11 जण ठार; लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

बालोद/धमतरी/कांकेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार झाले. मृत सर्व एकाच कुटुंबातील होते. ते बोलेरोमधून लग्न सोहळ्यावरून परतत होते. वाटेत जगत्रा गावाजवळ ट्रकने कारला धडक दिली. यात भीषण अपघातात सर्वांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या एका दीड वर्षांच्या मुलीचा रायपूरला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धमतरी जिल्ह्यातील सोरेम गावातील साहू परिवार कांकेरला या ठिकाणी जात होते. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांचे वाहन राष्ट्रीय महामार्ग-30 वरील बालोद येथील जगत्रा येथे आले. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. यात एक बालक, 5 महिला आणि 4 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.

या भीषण अपघातात एका चिमुकलीचाही मृत्यू झाला.
या भीषण अपघातात एका चिमुकलीचाही मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, एका व्यक्तीचे डोके फुटले. शेजारी बसलेली बाई रडत होती.
अपघात एवढा भीषण होता की, एका व्यक्तीचे डोके फुटले. शेजारी बसलेली बाई रडत होती.
ट्रकच्या धडकेनंतर बोलेरोची झाली अशी अवस्था, रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतर पोलीस पथक पोहोचले घटनास्थळी
ट्रकच्या धडकेनंतर बोलेरोची झाली अशी अवस्था, रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतर पोलीस पथक पोहोचले घटनास्थळी

महामार्गावरून जाणाऱ्या लोकांच्या माहितीवरून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना रायफूरला रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये यांचा समावेश
धर्मराज साहू, उषाबाई साहू, केशव साहू, तोमीन बाई साहू, लक्ष्मीबाई साहू, मिस रमा साहू, शैलेंद्र साहू, संध्या साहू, इशांत साहू, चालक दमेश ध्रुव, योगांश साहू.

मृतदेह गावी पाठवण्यात येईल
सर्व मृतदेह धमतरी जिल्ह्यातील गुरुर येथील सौदी येथे ठेवण्यात आले आहेत. येथून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. थोड्याच वेळात सर्व मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या गावी पाठवण्यात येतील.

तपासासाठी पथक नेमले
एसपी डॉ. जितेंद्र यांनी सांगितले की, या घटनेच्या तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. फरार ट्रक चालकाला लवकरात लवकर अटक करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी रात्री उशिरा ट्विट केले. लिहिले - दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य देवो.